Corona Vaccination : ऐतिहासिक कामगिरीपासून एक पाऊल दूर! देशात लसीकरणाचा 99 कोटींचा टप्पा पूर्ण

जाणून घ्या भारतात कोणत्या महिन्यात किती डोस देण्यात आले

Updated: Oct 19, 2021, 08:14 PM IST
Corona Vaccination : ऐतिहासिक कामगिरीपासून एक पाऊल दूर! देशात लसीकरणाचा 99 कोटींचा टप्पा पूर्ण title=

मुंबई : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) मोहिम वेगाने सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीचे (COVID19 Vaccinations) 99 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत. लसीकरणाचा वेग पाहता पुढच्या एक-दोन दिवसात लसीच्या 100 कोटी डोसचा (milestone of 100 crore) आकडा पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. (India set to reach 100 crore vaccine doses mark next 2 days)

16 जानेवारीला कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु झाली. त्यानंतर आज 99 कोटींचा आकडा पार केला. यात पहिला आणि दुसरा डोसचाही समावेश आहे. 

देशात सध्या लसींना मान्यता आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या लसींचा समावेश आहे. आतापर्यंत दिलेल्या लसीच्या डोसमध्ये कोविशिल्डच्या सर्वाधिक 86 कोटी 95 लाख 55 हजार 742 डोस आहेत. कोव्हॅक्सिनचे 11 कोटी 30 लाख 66 हजार 398 डोस कोव्हॅक्सिनचे देण्यात आले आहेत. तर स्पुटनिकचे 10 लाख 43 हजार 017 डोस दिले गेले आहेत.

कोणत्या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण

18 ते 44 वर्ष वयोगट  - 54,74,60,238
45 ते 60 वर्ष वयोगट - 26,71,90,118
60 वर्षांवरील वयोगट - 16,90,14,801

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेतंर्गत केंद्र सरकार राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मोफत कोविड लस उपलब्ध करुन देतं. आतापर्यंत केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना 102 कोटी लसीचे डोस पुरवले आहेत. 

कोणत्या महिन्यात किती लसीचा पुरवठा?

जानेवारी - 37 लाख 59 हजार डोस

फेब्रुवारी - 1 कोटी 5 लाख डोस

मार्च - 5 कोटी 8 लाख डोस

एप्रिल - 8 कोटी 98 लाख डोस

मे - 6 कोटी 1 लाख डोस

जून - 11 कोटी 97 लाख डोस

जुलै  - 13 कोटी 45 लाख डोस

ऑगस्ट - 18 कोटी 38 लाख डोस

सप्टेंबर - 23 कोटी 6 लाख डोस

ऑक्टोबर - 28 कोटी डोस उपलब्ध होण्याची शक्यता

देशात लसीची कमतरता भासणार नाही असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. पुढच्या महिन्यापर्यंत आवश्यकतेपेक्षा जास्त डोस उपलब्ध होतील आणि देशातील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर जे डोस उरतील ते इतर देशात पाठवले जातील असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. भारताने आतापर्यंत नेपाळ, बांग्लादेश, इराण, म्यानमार या सारख्या देशांना 10 लाख कोरोना डोस पुरवले आहेत.