नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे ३ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ हजार ५३४ रुग्ण एकदम ठणठणीत झाले आहेत. तर ६६ हजार ३३० जणांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ लाख ९८ हजार १९७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातल्या ३ लाख ३९ हजार ४१८ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. तर कोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २१ लाख ५६ हजार २८८ इतकी आहे..
BreakingNews । भारतात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला । तर कोरोनामुळे ३ हजार ५८३ जणांचा मृत्यू https://t.co/zUoGCpjMvJ#Coronavirus #CoronavirusUpdates#Coronalockdown #Covid19 @ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2020
देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ६ हजार ८८ इतकी विक्रमी वाढ झाली. देशातली एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ४४७ झाली असून ६६ हजार ३३० जणांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत १४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३ हजार ५८३ झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५३३ रुग्ण बरे झाले असून रुग्णांचे बरे होण्याचं प्रमाण ४० पूर्णांक ९७ शतांश टक्के झालं आहे.
महाराष्ट्र राज्यात काल आणखी दोन हजार ३४५ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातली एकूण रुग्णसंख्या ४१ हजार ६४२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ४५४ जण या आजारानं मरण पावले. राज्यात आतापर्यंत ११ हजार ७२६ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर मुंबईत काल एक हजार ३८२ रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णांचा आकडा २५ हजार ३१७ इतका झाला. ४१ रुग्ण मरण पावले. मुंबईच्या वर्सोवा कोळीवाड्यातले १०५ पैकी ८५ रुग्ण आज पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.