ड्रेस फिट न झाल्याने 'मन्नत'मध्ये मुलीचा फूल राडा, शाहरुखबरोबर भांडण, वाद हाणामारीपर्यंत... Video व्हायरल

क्षुल्लक गोष्टीवरुन मुलीचा शाहरुखबरोबर वाद झाला आणि वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Updated: Jan 28, 2023, 09:52 PM IST
ड्रेस फिट न झाल्याने 'मन्नत'मध्ये मुलीचा फूल राडा, शाहरुखबरोबर भांडण, वाद हाणामारीपर्यंत... Video व्हायरल

Viral News : कपड्याच्या एका दुकानातून (Cloth Shops) घेतलेला ड्रेस (Dress) फिट झाला नाही म्हणून एका मुलीने त्या दुकानात राडा केला. इतक्यावरच ती थांबली नाही तर तीने दुकान मालकाचीही धुलाई केली. या प्रकरणी पोलीस स्थानकात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राजस्थानमधल्या (Rajasthan) जोधपूरमधली ही घटना आहे.

26 जानेवारीला एका मुलीने जोधपूरमधल्या सरदापूर भागातील 'मन्नत कलेक्शन' या दुकानातून ड्रेस विकत घेतला. पण या ड्रेसची फिटिंग ठिक वाटत नसल्याने दुकानदाराला सांगितलं. यावरुन दुकानदार शाहरुख आणि त्या मुलीमध्ये बाचाबाची झाली. या घटनेची माहिती मुलीने आपल्या घरच्यांना दिली. मुलीच्या घरचे तिकडे पोहोचले आणि त्यांनी दुकानदाराशी वाद घातला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या चार लोकं जखमी झाले आहेत. 

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'पतली कमरीया'वर रिल... टीका करणाऱ्याला रुपाली ठोंबरे यांचं उत्तर

मुलीने दुकान मालक शाहरुख आणि कर्मचारी सलमान विरोधात छेडछाड आणि मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. तर दुकान मालक शाहरुखने मुलीच्या कुटुंबियांविरोधात दुकानात घुसून मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. हाणामारीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

हे ही वाचा : Onling Shopping : मुलीने ऑनलाईन मागवलं Sanitary Napkins, पाकिट उघडताच बसला धक्का..

या घटनेचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. व्हिडिओत तक्रारदार मुलगीही दुकानदाराला मारहाण करताना दिसत आहे. दुकानात सुरु झालेली हाणामारी रस्त्यावर आली. दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवर हल्ला करताना या व्हिडिओत दिसतायत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं. दुकानदार आणि मुलीने एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलीबरोबर आलेल्या लोकांनी दुकानातील गल्ल्यातून 50 हजार रुपये चोरल्याचा आरोपही दुकानदाराने केला आहे.