Crime News : पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. ही घटना ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, माणूस इतका क्रुर होऊ शकतो हे या घटनेवरुन समोर आलं आहे. जिच्यासोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली, तिच्यासोबतच क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.
काय आहे प्रकरण?
मध्यप्रदेशमधली (Madhya Pradesh) ही संतापजनक घटना असून श्योपूर (Sheopur) जिल्ह्यातल्या सेन छात्रावास इथं हे पती-पत्नी रहातात. पती अंमलीपदार्थांच्या आहारी गेला होता. त्याच्या या व्यसनामुळे पत्नी त्रस्त होती.या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. पत्नी मोलमजुरी करुन कसंबसं घर चालवते. तर पती व्यसनासाठी बळजबरीने तिच्या पैसे घेत असे. पैसे न दिल्यास तिला मारहाण करत होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडणं होत असत.
क्रुरतेची परिसीमा गाठली
घटनेच्या दिवशी आरोपी पतीने पत्नीकडे नशेसाठी पैशांची मागणी केली. यावरुन दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. पतीने तिला पुन्हा मारहाण केली. पण यावेळी त्याने क्रोर्याची परिसीमा गाठली. पैसे देत नसल्याने पतीने पत्नीचे हात पाय दोरीने बांधले आणि तिच्या प्राइव्हेट पार्टमध्ये चिटकवण्यासाठी वापरण्यात येणारं फेविक्विक (Feviquick) टाकलं.
असहाय्य पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला. पण पतीला जराही दया आली नाही. तिच्या आरडाओरडा ऐकूण आजूबाजूचे मदतीसाठी धावले. त्यांनी त्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, या घटनेनं खळबळ उडाली असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.