Shocking : प्रॉपर्टी डिलर पतीला संपवण्यासाठी पत्नीची किलिंग डील, दिलं तब्बल इतकं तोळं सोनं

महिला आणि तिच्या प्रियकराने मिळून प्रॉपर्टी डिलर पतीला संपवण्याचा कट आखला, असा झाला पर्दाफाश

Updated: Nov 7, 2022, 11:33 PM IST
Shocking :  प्रॉपर्टी डिलर पतीला संपवण्यासाठी पत्नीची किलिंग डील, दिलं तब्बल इतकं तोळं सोनं title=

Crime News : पतीला संपवण्यासाठी पत्नीने चक्क लाखो रुपयांचं सोनं दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचा पती प्रसिद्ध प्रॉपर्टी डिलर असून त्या महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा पतीच्या संपत्तीवर डोळा होता. संपत्ती हडपण्यासाठी तीने पतीला संपवण्याचा कट आखला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह एकाला अटक केली आहे. महिलेचा प्रियकर मात्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबरची ही घटना आहे. दिल्लीजवळच्या ग्रुरुग्राममधल्या पालम विहार परिसरात प्रॉपर्टी डिलर धर्मेश यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात पोलिसांना धर्मेश यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची माहिती मिळाली.

मोलकरणीने केली हत्येसाठी मदत
धर्मेश यांची पत्नी नीतूने घरी काम करणाऱ्या मोलकरणीला कटात सहभागी करुन घेतलं. त्या मोलकरणीने बबलू खान नावाच्या तरुणाची नीतूशी ओळख करुन दिली. दोन तीन भेटीनंतर त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. यानंतर नीतू आणि बबलू खानने धर्मेश यांची प्रॉपर्टी हडपण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी धर्मेशला संपवण्याचं ठरवलं.

हे ही वाचा: T20 World Cup दरम्यान मोठी बातमी, हा क्रिकेटर फसला हनीट्रॅपमध्ये

करोडो रुपयांची संपत्ती
प्रॉपर्टी डिलर धर्मेश हा करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक होता. गुरुग्राममधल्या मोठ्या प्रॉपर्टी डिलरमध्ये त्याचं नवा घेतलं जात होतं. पालम विहार सारख्या पॉश परिसरात त्याचे काही फ्लॅट होते. धर्मेश आणि नीतू यांच्या नात्यात काही कारणाने दुरावा आला होता. त्यामुळे धर्मेशची हत्या करत त्याची संपत्ती लाटण्याचा नीतूचा विचार होता. यासाठी तीने प्रियकर बबलू खान आणि त्याचा मित्र मोईनुद्दीन यांना सुपारी दिली. यासाठी तीने तब्बल 65 तोळे सोनं दिलं. याची किंमत जवळपास 34 लाख रुपये इतकी आहे. 

30 ऑक्टोबरला धर्मेशची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबरला रात्री उशीरा पालम विहार परिसरात दोघांनी धर्मेश यांची गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत नीतू आणि मोइनुद्दीनला अटक केली. तर महिलेचा प्रियकर बबलू खान फरार आहे. सुरुवातीला नीतूने पोलिसांना दाद लागू दिली नाही. पण पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अखेर तीने आपला गुन्हा कबूल केला.