वाघाच्या शिकारीवर मगरीचा डोळा, एका झटक्यात काय घडलं पाहा व्हिडीओ

डुकराची शिकार करणाऱ्या वाघावर मगरीचा हल्ला पण... घडलं भलतंच पाहा व्हिडीओ 

Updated: May 27, 2022, 11:37 AM IST
वाघाच्या शिकारीवर मगरीचा डोळा, एका झटक्यात काय घडलं पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : वाघ आणि सिंहाच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वाघालाही विशालकाय मगरीला घाबरून राहावं लागतं. याचं प्रत्यय एक व्हिडीओ पाहून येत आहे. डुकराची शिकार करणाऱ्या वाघालाही मगरीपासून पळण्याची वेळ आली. 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाघाने रान डुकराची शिकार केल्याचं दिसत आहे. तो रान डुकराला पकडून त्याची शिकर करत असताना मागून मगर येते. 

वाघाच्या शिकारीच्या खेळात मगरीने खो घातला. मात्र वाघाने आपली शिकार बाजूला नेली आणि मगरीपासून दूर गेला. मगरीला पुढे काय करावं हे बहुदा समजलं नसावं किंवा ती वाघाने तिथून जाण्याची वाट पाहात असावी.

वाघ मगरीच्या हल्ल्यापासून स्वत:ला आणि रान डुकराला वाचवतो. वाघ आपली शिकार वाचवून मगरीला हुल देतो. शेवटी मगरीकडे एका जागी बसून हा सगळा खेळ पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. 

हा व्हिडीओ @wildcapturd नावाच्या एका युजरने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. त्याला 51 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडीओ ऑक्टोबर 2020 मधील असल्याचं सांगितलं जात आहे. 

धक्कादायक व्हिडिओ पाहून लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सच्या म्हणण्यानुसार वाघाने मगरीला काहीही किंमत दिली नाही. वेगवेगळ्या लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.