Jammu Kashmir : आता दहशतवाद्यांची खैर नाही; गृहमंत्रालयानं J & K मध्ये पाठवला 'हा' अधिकारी

गृहमंत्रालयाची कडक कारवाई 

Updated: Oct 18, 2021, 02:33 PM IST
Jammu Kashmir : आता दहशतवाद्यांची खैर नाही; गृहमंत्रालयानं J & K मध्ये पाठवला 'हा' अधिकारी
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir)मध्ये सुरु असणाऱ्या टार्गेट किलिंग प्रकरणी आता केंद्र सरकारनं मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता केंद्राची नजर असून, आता त्या दृष्टीनं मोठ्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर एका खास व्यक्तीला जम्मू काश्मीरला पाठवण्यात आलं आहे. 
 
सीआरपीएफकडून जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्यात आलेली ही व्यक्ती आहे डीजी कुलदीप सिंह. ते नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीचेही डीजी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

गृहमंत्रालयाची कडक कारवाई 
केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गृह मंत्रालय काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शिवाय आयबी, एनआयए, सैन्यदल आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा या ठिकाणांचा दौरा करत आहेत. त्यामुळं या भागामध्ये सध्या बऱ्याच घडामोडीही घडत असल्याचं कळत आहे. 

सुरक्षा यंत्रणांकडून उचलल्या जाणाऱ्या या पावलांमुळे दहशतवादी संघटनांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या टार्गेट किलिंग प्रकरणानं साऱ्या देशाला हादरा दिला आहे. दहशकतवाद्यांच्या या कारवाया पाहता आता त्यांचे हल्ले आणखी सहन न करण्याचा मनसुबा बाळगत गृह मंत्रालय सक्तीच्या कारवाई करताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून भारतीय संरक्षण यंत्रणांकडून जवळपास 132 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, 254 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.