चक्रीवादळाची नावं कशी ठरवली जातात?

बांगलादेशाकडून या वादळाला 'निसर्ग' हे नाव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. 

Updated: Jun 2, 2020, 08:54 PM IST
चक्रीवादळाची नावं कशी ठरवली जातात?
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये आलेल्या 'अम्फान' चक्रीवादळानंतर, आता पुन्हा आठवड्यानंतर देशात आणखी एका वादळाचा धोका निर्माण झाला आहे. 'निसर्ग' वादळ असं या वादळाचं नाव आहे. हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्रकिनापट्टीजवळ सरकते आहे. 'निसर्ग' या वादळाचा अर्थ प्रकृती असा आहे. भारताच्या शेजारील बांगलादेशाकडून या वादळाला 'निसर्ग' हे नाव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. संपूर्ण देशांच्या एका समूहाकडून तयार करण्यात आलेल्या चक्रीवादळांच्या यादीमध्ये आता हे नावदेखील जोडण्यात आलं आहे.

हिंदी महासागरात चक्रीवादळांच्या नावांची सुरुवात 2000मध्ये झाली आणि 2004 मध्ये एका फॉर्म्युलावर सहमती दर्शविण्यात आली. त्यानंतर काही चक्री वादळांची नावं गति (भारताकडून देण्यात आलेलं नाव), निवार (ईरान), बुरेवी (मालदीव), तौकते (म्यानमार) आणि यास (ओमान) अशी ठेवण्यात आली.

निसर्ग चक्रीयवादळाचा धोका वाढला, लोकांना सुरक्षित स्थळी हवलण्याचं काम सुरु

वैज्ञानिक समुदाय आणि आपत्ती व्यवस्थापकांना चक्रीवादळांची ओळख करण्यास, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यास आणि त्याबाबत प्रभावीपणे इशारा देण्यास मदत करण्यासाठी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची अशाप्रकारे नावं ठेवली जातात.

2000 साली झालेल्या 27व्या अधिवेशनात, जागतिक हवामान संस्था आणि संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने, आशिया आणि पॅसिफिकसाठी, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नावावर सहमती दर्शविली.

बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड या पॅनलचा भाग होते. त्यानंतर 2018 मध्ये ईराण, कतार, सौदी अरब, यूएई आणि यमन या देशांनाही सामिल करण्यात आलं. जगभरातील चक्रीवादळांची नावं क्षेत्रीय विशिष्ट हवामान विज्ञान केंद्र (आरएसएमसी) आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळ इशारा केंद्रांद्वारे (टीसीडब्ल्यूसी) देण्यात आली आहेत.

निसर्ग चक्रीयवादळ: पुढचे २ दिवस महत्त्वाचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भारतीय हवामान विज्ञान विभागाला एका प्रक्रियेचं पालन करत, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह उत्तर हिंद महासागरमध्ये विकसित होणाऱ्या चक्रीवादळांना नावं देणं अनिर्वाय करण्यात आलं आहे.

13 देशांच्या सल्ल्यांनुसार, आयएमडीने एप्रिल 2020 मध्ये चक्रीवादळांच्या नावांची एक यादी जाहीर केली. अर्नब, निसर्ग, आग, व्योम, अजार, प्रभंजन, तेज, गति, लुलु यांसारख्या 160 नावांची यादी तयार करण्यात आली आहे. चक्रीवादळांना देण्यात येणारी नावं लिंग, राजकारण, धर्म, संस्कृती यांच्याप्रति निष्पक्ष, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, आक्रमक होणार नाहीत अशी असावीत. त्याशिवाय चक्रीवादळांची नावं छोटी, उच्चार करण्यास सोपी असणंही गरजेचं आहे.

मुंबईपासून ४५० किमी दूर समुद्रात कमी दाबाचा पट्टा, १२ तासांत निसर्ग वादळात रुपांतर होणार