Cyclone Sitrang Latest Update: ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात सीतरंग नावाचं चक्रीवादळ निर्माण झालंय. या वादळामुळे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 12 राज्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट जाहीर केला आहे. (Cyclone Sitarang formed in the Bay of Bengal)
ओडीशा, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आहे. त्यामुळे आता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय.
येत्या 25 ऑक्टोबरला हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यावेळी वाऱ्याचा वेग 100 ते 110 किलोमीटर प्रतितास एवढा असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.
आणखी वाचा - भारतात दिवाळी तर पाकिस्तानात फुटले TV, पहिला व्हिडीओ समोर!
दरम्यान, IMD च्या अंदाजानुसार आज बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशसह बंगालच्या किनारी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात काही भागात एनडीआरएफच्या टीम देखील तैनात केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.