भारतात दिवाळी तर पाकिस्तानात फुटले TV, पहिला व्हिडीओ समोर!

Pakistan TV : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

Updated: Oct 23, 2022, 10:58 PM IST
भारतात दिवाळी तर पाकिस्तानात फुटले TV, पहिला व्हिडीओ समोर!

Virat Kohli India Vs Pakistan : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या मैदानात लोळवल्यानंतर आता भारतात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. भारताने  (India Vs Pakistan) पाकिस्तानचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात किंग कोहलीने कमाल दाखवत सामना भारताच्या पारड्यात खेचून घेतलाय. त्यामुळे सर्वत्र विराट कोहलीचीच (Virat Kohli) चर्चा होताना दिसत आहे.

पाकिस्तानविरुद्ध जिंकणं म्हणजे वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणं, असं समीकरण असतं. विराट कोहलीने भारतीयांना दिवाळी गिफ्ट दिलंय, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये शांतता पसरल्याचं दिसतंय. तर नेहमीप्रमाणे पाकिस्तानमध्ये टीव्ही देखील फुटल्या (TV broke in Pakistan) आहेत. यंदाचा पहिला व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

आणखी वाचा - India Vs Pakistan सामन्याची शेवटची ओव्हर, असा रंगला विजयाचा थरार...

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे एक व्यक्ती अखेरच्या चेंडूनंतर टीव्ही फोडताना दिसत आहे. हातात सापडलेला लॅपटॉप त्याने टीव्हीवर फेकून मारला.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, सामन्यावेळी अनेक दिग्गज खेळाडूंनी मजेशीर पोस्ट केल्या होत्या. सेहवागने हा व्हिडीओ शेअर केला. त्यावेळी त्याने मजेशीर कमेंट देखील केली. रिलॅक्स पडोसिओ, हा फक्त एक खेळ आहे तुम्ही खरोखर चांगला प्रयत्न केला, असं सेहवाग म्हणाला. आमच्या इथं फटाके फोडले जातायेत, पण तुम्ही टीव्ही कशाला फोडता, असं म्हणत सेहवागने पाकिस्तानला चिमटे काढले आहेत.