नवी दिल्ली : सोशल मीडियावरुन गोविंदा डान्समुळे व्हायरल झालेले डान्सिंग अंकल आता विदिशा महापालिकेचे सदिच्छा दूत बनले आहेत. प्रोफेसर असलेले संजीव श्रीवास्तव यांनी एका विवाहात केलेला डान्स अल्पावधीत व्हायरल झाला आणि हे डान्सिंग अंकल एका रात्रीत देशभरात प्रसिद्ध झाले.
संजीव श्रीवास्तव यांनी केलेल्या डान्स नंतर त्यांची ही प्रसिद्ध इन्कॅश करण्याची संधी विदिशा महापालिकेनं साधली. दरम्यान आपण एवढे प्रसिद्ध होई यावर आपला विश्वास बसत नसल्याचं ४६ वर्षीय प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं.
गोविंदाचे डाय-हार्ट फॅन असून आपण १९८२ पासून डान्स करत आहे, आता आपल्याला डान्समध्ये अधिक संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय.