मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 55 हजार 287 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 2 हजार 795 रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मंदावत असल्यामुळे दिलादायक वातावरण आहे.
India reports 1,27,510 new #COVID19 cases, 2,55,287 discharges & 2,795 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,81,75,044
Total discharges: 2,59,47,629
Death toll: 3,31,895
Active cases: 18,95,520Total vaccination: 21,60,46,638 pic.twitter.com/AgS0JDgEGH
— ANI (@ANI) June 1, 2021
देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,81,75,044 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,31,895 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 18,95,520 इतकी आहे. भारतात आतापर्यंत 21,60,46,638 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.