दिल्ली आयआयटीच्या भोजनात आढळला मृत उंदीर

रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाण्यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर आता दिल्ली आयआयटीच्या कॅन्टीनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 28, 2017, 04:24 PM IST
दिल्ली आयआयटीच्या भोजनात आढळला मृत उंदीर title=

नवी दिल्ली : रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाण्यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर आता दिल्ली आयआयटीच्या कॅन्टीनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

दिल्ली आयआयटीमधील कॅन्टीनच्या खाण्यात चक्क मृत उंदीर आढळला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मेसमधील नारळाच्या चटणीत मृत उंदीर आढळला.

जयंत दारोकर या विद्यार्थ्याला मृत उंदीर आढळल्या त्यानंतर त्याने त्याचा फोटो क्लिक करत तो फेसबुकवर अपलोड केला. जयंतने फेसबुकवर फोटो शेअर करताना म्हटलं की, ज्यावेळी मी मृत उंदीर पाहिला तोपर्यंत अनेकांनी ती चटणी खाल्ली होती. त्यानंतर मी या घटनेची माहिती मेसच्या सुपरवायजरला दिली.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आयआयटीने तीन जणांची एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं प्रकरण कळणार आहे.

दरम्यान, यापूर्वी रेल्वेच्या खाण्यात झुरळ आढळल्याचं समोर आलं होतं. इतकेच नाही तर कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या खाण्याच्या वस्तू शरीराला हाणिकारक आहेत.