चाचणीनंतर 30 दिवसांच्या आतील मृत्यू 'कोविड डेथ' समजले जाईल; केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाईन जारी

केंद्र सरकारने देशातील कोरोना मृत्यूंबाबत नवीन गाइडलाईन जारी केली आहे.

Updated: Sep 12, 2021, 08:08 AM IST
चाचणीनंतर 30 दिवसांच्या आतील मृत्यू 'कोविड डेथ' समजले जाईल; केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाईन जारी title=

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे देशात हाहाकार उडाला होता. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. केंद्र सरकारने देशातील कोरोना मृत्यूंबाबत नवीन गाइडलाईन जारी केली आहे. कोविड 19 पॉजिटिव झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यास (घरी किंवा रुग्णालयात) तर मृत्यू दाखल्यावर मृत्यूचे कारण कोविड 19 असे समजले जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने 30 जून रोजी निर्देश दिले होते की, ज्या लोकांचा मृत्यू कोरोनामुळे रुग्णालयात किंवा कोठेही झाला असेल. तर त्या मृत्यूला कोविड19 मुळे झालेला मृत्यू समजले जावे. सोबतच सरकारने स्पष्ट रुपरेखा बनवण्यावर निर्देश दिले आहेत. 

न्यायालयाच्या निर्देशानंतर आरोग्य मंत्रालय आणि इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च(ICMR)ने 3 सप्टेंबरला नवीन गाइडलाईन जारी केली. आता सरकारने कोविड 19 मुळे होणारे मृत्यूंसाठी सर्कुलर जारी केले आहे. त्याअंतर्गत एखाद्या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कोविड19 टेस्टच्या 30 दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास तो मृत्यू कोविड 19 डेथ मानली जाईल.