Delhi Acid Attack : अ‍ॅसिड विक्री करणाऱ्या 'या' दोन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे मुलींच्या जीवाला धोका?

Delhi Acid Attack: दिल्लीत बुधवारी झालेल्या अ‌ॅसिड हल्ल्यातील पीडितेची प्रकृती चिंताजनक असून आरोपींनी अ‌ॅसिड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेतले होते. त्यानंतर याप्रकरणी आता दिल्ली महिला आयोगाकडून नोटीस बजावली आहे. 

Updated: Dec 16, 2022, 11:09 AM IST
Delhi Acid Attack : अ‍ॅसिड विक्री करणाऱ्या 'या' दोन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे मुलींच्या जीवाला धोका?  title=

Delhi Acid Attack: दिल्लीतील द्वारका परिसरात बुधवारी (15 डिसेंबर) दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी एका विद्यार्थिनीवर (17 वर्ष) अ‍ॅसिड (Delhi Acid Attack marathi) फेकल.  तिचा चेहरा 8 टक्के भाजला असून तर तिच्या डोळ्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.सद्या ती शुद्धीवर आहे. नेत्रतज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जन तिच्यावर उपचार करत आहेत. सफदरजंग रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी ही माहिती दिली. याचदरम्यान पोलिसांच्या तपासात असे आढळून आले आहे की, आरोपींनी हे अ‌ॅसिड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून (flipkart) विकत घेतले होते. यावर दिल्ली पोलिसांनी फ्लिपकार्टला नोटीस पाठवली असून दिल्ली महिला आयोगाने देखील अ‌ॅमेझॉनला (amazon) नोटीस पाठवली आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (DCW Chairperson Swati Maliwal) यांनी ई-कॉमर्स  (e-commerce)कंपन्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (online shopping) ऍसिडच्या खुल्या विक्रीबाबत नोटीस बजावली आहे. आयोगाने ई-शॉपिंग (online shopping offer) प्लॅटफॉर्मवर अ‍ॅसिडच्या उपलब्धतेच्या कारणांसह त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 'अ‍ॅसिड' उत्पादन म्हणून सूचीबद्ध केलेल्या विक्रेत्यांचे तपशील मागवले आहेत.

वाचा : दिल्लीत आफताबचा जुळा भाऊ! बॉयफ्रेंडने 'असा' रचला हत्येचा कट, ऑनलाईन मागवलं अ‍ॅसिड आणि...

दिल्ली महिला आयोगाने (DCW) नोटीसमध्ये लिहिले आहे की, आरोपीने फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड विकत घेतल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती, पण अ‌ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर ते सहज उपलब्ध आहे. तुमच्या प्लॅटफॉर्मवर अ‌ॅसिड विकण्याचे कारण काय आहे? याचे उत्तर मागविले आहे.  

दिल्लीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, आरोपी सचिनने फ्लिपकार्टवरून अ‌ॅसिड मागवले होते. पेमेंटसाठी त्याने फ्लिपकार्टचे ई-वॉलेट वापरले. मात्र, यासंदर्भात फ्लिपकार्टकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही घटना 14 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता द्वारका परिसरात ही घटना घडली होती. तरुणी आपल्या लहान बहिणीसोबत जात असताना दुचाकीवरून दोघेजण आले. मागे बसलेल्या मुलाने तिच्यावर अ‌ॅसिड हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सचिन अरोरा (20 वर्षे), हर्षित अग्रवाल (19 वर्षे) आणि वीरेंद्र सिंग (22 वर्षे) अशी या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सचिन हा मुख्य आरोपी असून, त्याने हर्षित आणि वीरेंद्रच्या मदतीने हा गुन्हा केला.