ऑलिम्पिक चॅम्पियन सुशिल कुमारबाबत मोठी बातमी, जेलमधील मुक्कामाबाबत कोर्टाने दिला 'हा' निर्णय

Olympian Sushil Kumar : भारताचा कुस्तीपटू ऑलिम्पियवीर सुशील कुमारबाबत मोठी माहिती समोर 

Updated: Oct 12, 2022, 08:37 PM IST
ऑलिम्पिक चॅम्पियन सुशिल कुमारबाबत मोठी बातमी, जेलमधील मुक्कामाबाबत कोर्टाने दिला 'हा' निर्णय title=

Olympian Sushil Kumar : भारताचा कुस्तीपटू ऑलिम्पियनवीर सुशील कुमारच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. कुस्तीपटू सागर धनखर हत्या प्रकरणात तुरूंगात असलेल्या सुशील कुमारचा मुक्काम वाढला जाऊ शकतो. न्यायालयाने सुशील कुमार आणि इतर 17 जणांविरोधात गुन्हे निश्चित केले आहेत. (delhi court frames charges against olympian sushilkumar in sagar dhankar case)

नक्की काय आहे प्रकरण?
4 मेला छत्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय कुस्तीपटूला झालेल्या मारहाण प्रकरणात सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांना दिल्लीमधील मुंडका इथून अटक करण्यात आली होती. मारहाणीनंतर संशयित आरोपी सुशील कुमार 3 आठवडे फरार राहिला होता. सागर धनखर आणि त्याच्या दोन मित्रांना मारहाण करण्यात आली होती. मात्र धनखर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.  

दिल्ली पोलिसांनी अहवालात म्हटलं आहे की, या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा सुशील कुमार होता. त्याने इतर सहआरोपींसोबत हरियाणा आणि दिल्लीतील गुन्हेगारांसह हा कट रचला होता. सुशील कुमारने 18 मेला अटक टाळण्यासाठी दिल्लीतील रोहिणी कोर्टामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणामध्ये एकतर्फी कारवाई केली जात असल्याचं सुशीलचं म्हणणं होतं. मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती.  

दिल्ली पोलिसांनीही सुशीलने मार्चमध्ये जामीन अर्ज केला होता त्याला विरोध केला होता. कारण या प्रत्यक्षदर्शी कुस्तीपटू घाबरले असून त्यांनी संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली होती.  कोर्टाने आता सुशीलसह 17 जणांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आणि इतर कलमांखाली गुन्हे निश्चित केले आहेत. त्यामुळे सुशील कुमारचा जेलमधील मुक्काम आणखी वाढणार असल्याचं दिसत आहे.