पगार मागितल्याने बॉस भडकला, महिला कर्मचारीला संपवलं... तुकडे करुन नाल्यात फेकले

दिल्लीतलं श्रद्धा खून प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका हत्येचा झाला उलगडा

Updated: Nov 15, 2022, 09:57 PM IST
पगार मागितल्याने बॉस भडकला, महिला कर्मचारीला संपवलं... तुकडे करुन नाल्यात फेकले title=

Crim News : दिल्लीतलं श्रद्धा खून प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. श्रद्धा वॉकर या तरुणीची तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने हत्या करुन तिच्या शरिराचे 35 तुकडे केले आणि ते दिल्लीतल्या महरौलीच्या जंगलात फेकून दिले. हे प्रकरण ताजं असतानाच चार वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीने मुलीची हत्या करत तिच्या शरिराचे सहा तुकडे करुन ते नाल्यात फेकून दिले होते. (delhi crime news police arrested accused to murder minor girl )

त्या मुलीची चूकी काय?
मृत मुलीची चूक फक्त इतकीच होती की तीने आपल्या बॉसकडे पगार मागितला होता. पगार न दिल्यास पोलिसांत तक्रार देण्याची धमकी तीने दिली होती. यामुळे भडकलेल्या बॉसने त्या मुलीची हत्या केली. 17 मे 2018 ला ही घटना घडली होती. याप्रकरणी चार वर्षांनंतर पोलिसांनी आरोपीला झारखंडमधून अटक केली आहे. दिल्लीच्या मियांवली नगरमध्ये मुलीचा मृतदेह सहा तुकड्यांमध्ये आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. मात्र मुख्य आरोपी शालू टोपनो हा चार वर्षांपासून फरार होता.

आरोपी शालू टोपनो याला पोलिसांनी फरार घोषित केलं होतं. त्याच्यावर 50 हजार रुपायंचं इनामही घोषित करण्यात आलं होतं. अटक टाळण्यासाठी शालू वारंवार राहण्याच्या जागा बदल होत्या. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं तयार केली होती. पण तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यानंतर शालू झारखंडमध्ये असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तात्काळ एक पथक पाठवत त्याला अटक केली.

शालू टोपनोचा जबाब
पोलिसांनी शालू टोपनोला अटक करुन दिल्लीत आणलं. पोलीस तपासात त्याने मुलीची हत्या करण्याचं कारण सांगितलं. शालू मॅनपॉवर प्लेसमेंट एजेंसी चालवत असे. 2015 मध्ये झारखंडमधली एक 12 वर्षांची मुलगी त्याच्याकडे काम मागण्यासाठी आली. त्या मुलीला दिल्लीत एका घरात काम मिळवून दिलं. तीन वर्षांनंतर त्या मुलीला पुन्हा आपल्या घरी परतायचं होतं. यासाठी तीने शालूकडे आपल्या पगाराची मागणी केली. ही रक्कम जवळपास दोन लाखांपर्यंत गेली होती.

शालू काहीतरी कारणं सांगून त्या मुलीला पैसे देण्यापासून टाळाटाळ करत होता. त्यामुळे वैतागलेल्या मुलीने त्याची पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. धमकी दिल्याने संतापलेल्या शालूने त्या मुलीला आपल्या कार्यालयात बोलवून तिच्या डोक्यात वजनदार वस्तूने वार केला. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर आपल्या तीन साथीदारांबरोबर मिळून त्याने त्या मुलीच्या शरिराचे सहा तुकडे केला आणि ते एका नाल्यात फेकून दिले.