Police Encounter: ४ लाख रुपयांचं बक्षिस असलेल्या गुंडांना चकमकीत महिला पोलिसाने गोळ्या घातल्या

देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) गुरुवारी सकाळी गुंड आणि पोलिसांमध्ये (Delhi Police Encounter) चकमक झाली. 4 लाखांचे बक्षीस असलेला रोहित चौधरी

Updated: Mar 25, 2021, 05:51 PM IST
Police Encounter: ४ लाख रुपयांचं बक्षिस असलेल्या गुंडांना चकमकीत महिला पोलिसाने गोळ्या घातल्या title=

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) गुरुवारी सकाळी गुंड आणि पोलिसांमध्ये (Delhi Police Encounter) चकमक झाली. 4 लाखांचे बक्षीस असलेला रोहित चौधरी आणि 2 लाखांचे बक्षीस असलेला परवीन उर्फ टीटू जखमी झाले आहेत. चकमकीदरम्यान महिला सब-इंस्पेक्टर प्रियांका आणि एसीपी पंकज यांनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी गुंडांवर गोळीबार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मार्चच्या मध्यरात्री पोलिसांना अशी माहिती मिळाली की, रोहित चौधरी हा त्याच्या साथीदारासोबत दिल्लीतील भैरो मार्गावर निळ्या रंगाच्या कारमध्ये होता. ही बातमी समजल्यानंतर दिल्ली पोलिसांनी भैरो मार्गाच्या पार्किंग जवळ सापळा रचला.

त्यानंतर भैरो रोडवर पहाटे 4 वाजून  50 मिनिटानी रिंग रोडवरून निळ्या रंगाची कार येताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेड लावत गाडी थांबविण्याचे संकेत दिले, परंतु कार थांबली नाही आणि बॅरिकेटला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:ला अडकलेलं पाहून गुंडांनी पोलिस टीमवर गोळीबार केला.

यानंतर पोलिसांनीही गुंडाच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारा दरम्यान, एसीपी पंकज आणि सब-इंस्पेक्टर प्रियंका (SI Priyanka) यांच्या बुलेट प्रूफ जॅकेटला एकेक गोळी लागली. त्याचवेळी गुंडाच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर दोन्ही गुंडांना त्वरित उपचारासाठी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिल्ली पोलिसांशी झालेल्या चकमकीत 4 लाखांचे बक्षीस असलेला रोहित चौधरी आणि 2 लाखांचे बक्षीस असलेला गुंड परवीन उर्फ टीटू जखमी झाले. या प्रकरणात रोहित चौधरी आणि परवीन उर्फ टीटू मकोका (MACOCA) हे दोघेही फरार होते. याशिवाय या दोघांवर खून, दरोड्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.