मुंबई : दिल्लीच्या सरोजनी निगरमध्ये असलेल्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील 7 विद्यार्थ्यांना शाळेतील काढून टाकलं आहे. या 7 विद्यार्थ्यांच्या शरीरातून दुर्गंध येत असल्यामुळे श्रीमंत घरातील मुलांना याचा त्रास होत असल्याने त्यांना काढून टाकलं आहे. पीडित मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी शाळेला पुन्हा विद्यार्थ्यांना घेण्याची विनंती केली आहे. मात्र शाळेने पालकांवर आरोप लावले आहेत की त्यांनीच शाळेतून काढून टाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरोजनी नगरमधील एनपी को - एज्युकेशन सेकंडरी शाळेने 4 महिन्यांपूर्वी एका मुलाला शरीरातून दुर्गंध येत असल्याचं सांगत ट्रान्सफर सर्टिफिकेट देऊन काढून टाकलं. आणि हेच कारण सांगत गेल्यावर्षी 6 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे विद्यार्थी गरीब कुटूंबातील आहेत.
पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगण्यात आलं की, तुमची मुले आंघोळ करून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अंगातून एक दुर्गंधी येत असते. तसेच त्यांचे कपडे देखील अस्वच्छ असतात म्हणून त्यांच्याकडून दुर्गंध येत असतो. शाळेने असं सांगितलं की, इतर विद्यार्थ्यांना या सगळ्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी या 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आहे.