साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क

Why Do Snakes Flick Their Tongue : सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वाधिक वेळा दिसणारा साप हा वारंवार आपली जीभ का बाहेर काढतो? जाणून घेऊयात यामागील वैज्ञानिक कारण...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 30, 2024, 01:54 PM IST
साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क title=
तुम्ही पण अनेकदा साप अशाप्रकारे फुस्कारताना पाहिला असेल (प्रातिनिधिक फोटो)

Why Do Snakes Flick Their Tongue : साप हा सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. मात्र सापाने आपली जीभ बाहेर काढली तर तो अधिक धोकायदाक वाटतो. अनेकदा तुम्ही डिस्कव्हरी सारख्या चॅनेल्सवरील डॉक्युमेंट्रींमध्ये किंवा अगदी क्वचितच प्रत्यक्षात सापांना अशाप्रकारे जीभ बाहेर काढताना पाहिलं असेल. मात्र सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वाधिक वेळा दिसणारा साप हा वारंवार आपली जीभ का बाहेर काढतो? जाणून घेऊयात यामागील वैज्ञानिक कारण...

विज्ञान काय सांगतं?

लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, जर एखादा साप वारंवार आपली जीभ बाहेर काढत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो आपल्या जीभेच्या सहाय्याने बाहेरील वातावरणाची चापणी करत असतो. म्हणजेच हे असे साप आपल्या आजूबाजूच्या परिसराची चाचपणी जीभेच्या मदतीने करत असतात. भोवतालचा परिसर कसा आहे हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

या कारणांसाठी वापरतात जीभ

सापांची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता फारच कमकुवत असते. त्यांना कोणताही आवाज फार उत्तम प्रकारे ऐकू येत नाही. त्यामुळेच जेव्हा गारुडी सापासमोर पुंगी वाजवतो तेव्हा तो त्याला पाहून आधी वेडावाकडा होऊन तडफडल्यासारखा करतो. सापाला ऐकू कमी येत असलं तरी गंधाच्या माध्यमातून तो वातावरणाचा अंदाज घेतो. आपल्या आजूबाजूंच्या शिकाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी साप जीभेचा वापर करतात. जीभेच्या मदतीनेच ते आजूबाजूचा वास घेतात.

जीभ बाहेर काढतो तेव्हा काय होतं?

जेव्हा एखादा साप आपली जीभ बाहेर काढून ती हलवतो तेव्हा तो त्या जीभेच्या माध्यमातून हवेतील छोटेछोटे अगदी अतीसूक्ष्म म्हणता येईल इतके बारीक द्रव्याचे कण गोळा करतो. त्यानंतर साप ही जीभ जॅकबसन नावाच्या तोंडातील भागामध्ये टाकतो. सापाच्या तोंडातील वरच्या बाजूस हे अंग असते. सापच्या जीभे बाजूचे दोन टोकदार दात (डंख) जॅकबसनच्या 2 छिद्रांमध्ये अगदी फीट बसतात.

इतर प्राण्यांतही हे असं दिसून येतं

जीभ जशी या जॅकबसनमध्ये जाते तशी तेथील काही विशिष्ट रसायनांची जीभेवरील अणुंशी रिअॅक्शन होते. हे संवेदनशील रिसेप्टर्स सापाच्या मेंदूला संदेश पाठवून हा गंध उंदाराचा आहे की इतर कोणत्या प्राणाचा हे मेंदूला कळवतात. गंधामध्ये फरक ओळखणाऱ्या संवेदनशील वेगळ्या पेशीही असतात. काही सरडे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्येही जेकबसन नावाचं हा भाग आढून येतो. त्यामुळेच हे प्राणी अनेकदा जीभ बाहेर काढून फुस्कारा सोडताना दिसतात.