YouTube वर Video पाहून बनवली 4 कोटींची कंपनी; Shark Tank India मध्ये ठेवला 50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

YouTube वर Video एका तरुणाने 4 कोटींची कंपनी उभी केली आहे. Shark Tank India शो मध्ये त्याच्या या कंपनीत 50 लाखांची गुंतवणुक करण्यात आली आहे.

वनिता कांबळे | Updated: Jan 25, 2024, 06:04 PM IST
YouTube वर Video पाहून बनवली 4 कोटींची कंपनी; Shark Tank India मध्ये ठेवला 50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव  title=

RodBez : यु ट्यूबकडे (YouTube ) अनेकजण मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहतात. अनेकजण मोबाईमध्ये YouTube वर व्हिडिओ पाहताना दिसतात. मात्र,  YouTube आणि इंटरनेटचा योग्य वापर केला तर आयुष्य बदलू शकते. बिहारच्या एका तरुणाने हे सिद्ध करुन दाखवले आहे.  YouTube वर Video पाहून या तरुणाने  4 कोटींची कंपनी कंपनी बनवली आहे. या तरुणाने आपली बिझनेस आयडिया Shark Tank India या शो मध्ये सादर केली आणि थेट  50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव  ठेवला. 

Shark Tank India या रियालिटी शो चा तिसरा सिजन सुरु झाला आहे. Shark Tank India या शो मध्ये आपला स्वत:चा स्टार्टअप सुरु करण्याच्या प्रयत्नात असलेले अनेकजण सहभागी होतात. आपल्या युनिक बिझनेस आयडिया ते या शो च्या माध्यमातून सादर करतात आणि आपल्या स्टार्टअपसाठी भांडवल उभा करण्याचा प्रयत्न करतात. Shark Tank India  च्या तिसऱ्या सिजनमध्ये बिहारच्या दिलखुश कुमार या तरुणाने आपली बिझनेस आयडिया सादर केली. दिलखुश कुमार याची स्टार्टअप आयडिया पाहून शो चे परिक्षण देखील शॉक झाले आहेत. 

YouTube वर Video पाहून अशी उभी केली  4 कोटींची कंपनी

दिलखुश कुमार हा RodBez  या स्टार्टअप कंपनीचा संस्थापक आहे.  विशेष म्हणजे YouTube वर Video पाहून दिलखुश कुमार याने   4 कोटींची कंपनी उभी केली आहे. YouTube कोंडिग शिकून दिलखुश कुमार याने  RodBez हे App तयार केले. RodBez  हे App प्रामुख्याने टॅक्सी सर्व्हिससाठी सुरु करण्यात आले आहे. 

Uber आणि Ola या कंपन्यांना  RodBez ची टक्कर

Uber आणि Ola या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी दिलखुश कुमार याने RodBez हे App लाँच केले आहे.  Uber आणि Ola यापेक्षा  RodBez या App ची सर्विस खूपच वेगळी आहे. या App चा ग्राहक आणि टॅक्सी ड्रायव्हर दोघांना फायदा होणार आहे.   Uber आणि Ola App वरुन कॅब बुक केल्यावर अनेकदा प्रवाशांना दोन्ही बाजूचे प्रवास भाडे भरावे लागते. यामुळे ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतात. मात्र,  RodBez या App मध्ये प्रवाशाने कॅब बुक केल्यावर त्याला पिक करायला जाईपर्यंतच्या प्रवासात ड्रायव्हर आपला वेगळा रुट तयार करुन या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्व्हिस देऊ शकतो. यामुळे कॅब बुक करणाऱ्या प्रवाशाकडून दोन्ही बाजूच्या प्रवास भाडे आकारण्याची गरज पडणार नाही. याचा ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांना फायदा होणार असल्याचे दिलखुश कुमार याने सांगितले. 

दिलखुश कुमार याच्या कंपनीत 50 लाखांची गुंतवणुक

Shark Tank India मध्ये दिलखुश कुमार याने आपली बिझनेस आयडिया मांडली. दिलखुश कुमार याच्या  RodBez या कंपनीत रितेश अग्रवाल आणि नमिता थापर यांनी 50 लाखांची गुंतवणुक केली आहे. यापैकी यामध्ये 20 लाख रुपये बिनव्याजी तर, 30 लाख रुपये हे 5 टक्के व्याजदराने गुंतवण्यात आले आहेत.