Save Electricity Through Fridge : अनेकजण फ्रिजचा वापर करतात. मात्र फ्रिज ठेवताना घराची भिंत आणि त्यामध्ये किती अंतर असावं याबाबत कुणालाच माहित नसते. या एका छोट्या चुकीमुळे विजेच्या बिलात भरमसाठ वाढ होते. विजेचं बिल आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करत असतं. त्यामध्ये हा प्रयत्न नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. काही जण फ्रिज हॉलमध्ये ठेवतात तर काही जण किचनमध्ये त्याची जागा निवडतात. फ्रिज ठेवण्यासाठी निश्चित अशी जागा नसते कारण ते मावेल तिथे ठेवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. यामुळे फार काही फरक पडत नाही. पण फ्रिज आणि भिंतीतील अंतर फार महत्वाच ठरतं. कारण या एका फरकामुळे तुमच्या खिशाला आराम बसणार आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फ्रिज आणि भिंतीमध्ये ६ ते १० इंचाचे अंतर असावे. फ्रिजला आतून थंड राहण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अशावेळी फ्रिजच्या शेजारी खेळती हवा असेल तर त्याला नक्कीच मदत होते. फ्रिजचा थेट भिंतीला चिटकवून ठेवू नये. एवढंच नव्हे तर काही जण फ्रिच तिन्ही बाजूंनी इतर गोष्टींनी जागा भरून टाकतात. अशावेळी फ्रिजला मोकळी हवा बाहेरून मिळत नाही. ज्यामुळे खेळती हवा न मिळाल्यामुळे फ्रिज थंड व्हायला त्रास होतो.