तेलांगणामधील मोफत साड्या वाटप कार्यक्रमात महिलांनी झिंज्या उपटल्या

तेलंगणामध्ये बाथुकम्मा उत्सवाच्यानिमित्ताने दारिद्र्य रेषेखाली महिलांना साड्या वाटल्या. यावेळी साडी वाटपाच्यावेळी महिलांमध्ये राडा पाहायला मिळाला.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 19, 2017, 07:45 PM IST
तेलांगणामधील मोफत साड्या वाटप कार्यक्रमात महिलांनी झिंज्या उपटल्या title=

अमरावती : तेलंगणामध्ये बाथुकम्मा उत्सवाच्यानिमित्ताने दारिद्र्य रेषेखाली महिलांना साड्या वाटल्या. यावेळी साडी वाटपाच्यावेळी महिलांमध्ये राडा पाहायला मिळाला. महिलांनी एकमेकींचे केस ओढून हंगामा केला. तर साड्या खराब असल्याचे लक्षात आल्यानंतर या साड्या जाळून निषेध व्यक्त केला.

तेलंगणामधील के चंद्रशेखर राव सरकारकडून साड्या वाटप करण्यात आल्या. १.०४ कोटी महिलांना २२२ कोटी रुपयांच्या साड्या वाटल्या. सियादबाद येथे साड्या घेण्यासाठी झुंबड उडाली आणि महिलांची मारामारी पाहायला मिळाली. ही कालची घटना आहे.

दरम्यान, काही ठिकाणी साड्या खराब होत्या. या साड्यांची किंमत ५० रुपये नाही, असा आरोप काही महिलांनी केलाय. आपला राग व्यक्त करताना साड्यांची होळी केली.