चंद्रावर भूकंप होतात का? चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर Vikram lander आणि Pragyan rover संशोधन करणार

चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ही कामगिरी अभिमानास्पद आहे.

Updated: Aug 23, 2023, 07:31 PM IST
चंद्रावर भूकंप होतात का? चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर  Vikram lander आणि Pragyan rover संशोधन करणार title=

Successful landing of Chandrayaan-3  : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं इतिहास घडवला आहे. चांद्रयान 3 चे   चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाले आहे. अमेरिका आणि रशियाला सुद्धा जमलं नाही ते भारताच्या इस्रोनं करून दाखवले आहे. भारताच्या इस्त्रोने आज ऐतिहासिक कामगिरी केलीय. चांद्रयान मोहिम यशस्वी ठरली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा फडकला आहे. चांद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाले असून Vikram lander आणि Pragyan rover आता मोठी जबाबदारी असणार आहे. 

20 मिनिटानंतर Pragyan rover हा Vikram lander मधून बाहरे

चांद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर Vikram lander मधून  Pragyan rover बाहेर. लँडरच्या पोटात Pragyan rover ठेवण्यात आले आहे. लँडिंगनंतर Vikram lander चा दरवाजा उघडून  Pragyan rover बाहेर येईल. विक्रम लँडरचा आकार 6.56 फूट x 6.56 फूट x 3.82 फूट इतका आहे. चांद्रयान 2 च्या मोहिमेतून धडा घेवून चांद्रयान 3 मध्ये  अधिक सेन्सर्ससह लँडर अधिक मजबूत करण्यात आला आहे. विक्रम लँडरमध्ये काही खास तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. लेसर आणि आरएफ आधारित अल्टिमीटर, लेसर डॉपलर वेगमापक आणि लँडर स्पीड कॅमेरा, लेसर गायरो आधारित एक्सेलेरोमीटर पॅकेज आहे. 

चंद्रावर भूकंप होतात का?

चंद्रावर लँडर सुरक्षितरित्या उतरलंय, आता ते चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. चंद्रावर भूकंप होतात का, याचाही अभ्यास लँडर आणि रोवर करणार आहेत. चांद्रयान ३ मोहीम यशस्वी होणं हे भारतासाठी तर मोठं यश आहेच, तसंच जगासाठी हा एक मोठा माईलस्टोन ठरणार आहे. कारण आजपर्यंत एकाही देशानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवलेलं नाही.  अमेरिका, रशिया, चीननंतर भारत चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश ठरलाय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरलाय

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या पाण्याचं नेमकं स्वरुप समजेल. चंद्रावर माणूस पाठवण्याच्या अमेरिकेच्या मोहिमेला मदत होणार आहे. याआधी चीननं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश आलं नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुव अनेक रहस्यांनी भरलेला आहे.  2008 मधल्या भारताच्या चांद्रयान एक मोहिमेनंच चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे पाठवले होते. त्यानंतर जगभरातल्या चंद्र मोहिमांना नवी दिशा मिळाली होती. आता चांद्रयान ३ आणखी एक पाऊल पुढे टाकत चंद्रावरची नवी रहस्य उलगडेल अशी अपेक्षा आहे.