तुम्हीही खाता दूध आणि केळं एकत्र.... आजच थांबवा ..शरीरावर होईल वाईट परिणाम..

केळी आणि दूध एकत्र घेतल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते हे फार कमी लोकांना माहिती आहे

Updated: Jul 25, 2022, 09:37 PM IST
तुम्हीही खाता दूध आणि केळं एकत्र.... आजच थांबवा ..शरीरावर होईल वाईट परिणाम..  title=

काही गोष्टी आरोग्यासाठीही अयोग्य असतात.. ज्या हानिकारक ठरू शकतात. यापैकी एक म्हणजे बनाना-मिल्क शेक. जीम ट्रेनर्स अनेकदा बारीक लोकांना त्यांच्या आहारात बनाना-मिल्क शेकचा समावेश करण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात, बहुतेक लोकांना इतर शेकपेक्षा जास्त बनाना-मिल्क शेक जास्त आवडतात.पण केळी आणि दूध एकत्र घेतल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते हे फार कमी लोकांना माहिती आहे. कसे ते जाणून घेऊया.

बनाना-मिल्क शेकचा मेंदूवर होतो वाईट परिणाम 

Health tips:  दूध आणि केळ्याचं सेवन केल्याने तुम्हाला फायदे मिळत आहेत असं वाटत असेल पण नाही,आयुर्वेदानुसार  केळ्यामध्ये फायबर असतं आणि दुधात कॅल्शियमचं प्रमाणदेखिल जास्त असतं. यामुळे तुम्ही केळी आणि दूध एकत्र सेवन करू शकत नाही. त्याच्या सेवनाने हार्मोन्सवर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे मनावरही परिणाम होऊ लागतो.

आयुर्वेद काय म्हणतं

आयुर्वेदानुसार केळी आणि दूध हे असेच एक मिश्रण आहे. ज्याच्या सेवनाने शरीरात विषद्रव्ये तयार होतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो. याच्या सेवनाने शरीरातील अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते.
 
गर्भवती महिलांनाही त्रास होऊ शकतो

गर्भधारणेनंतर, स्त्रियांना काही गोष्टींचे सेवन करण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, बाळांची चांगली काळजी घेण्यासाठी दूध आणि केळीचे सेवन करू नये. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाण वाढू शकते. यामुळे अॅलर्जीसोबतच अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पोटातील बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो.