रात्रीच्या आंधारात चमकणारी ही खतरनाक गोष्ट कोणती? फोटो पाहताच उडाली भंबेरी

कधी कधी समोर असलेली गोष्ट नक्की काय हे आपल्याला कळत नाही. असाच एख खतरनाक फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. तो नक्की कोणाचा हे तुम्हाला कळतंय का ते सांगा...

Updated: Apr 8, 2022, 10:12 AM IST
रात्रीच्या आंधारात चमकणारी ही खतरनाक गोष्ट कोणती? फोटो पाहताच उडाली भंबेरी title=

Guess Who is in this Picture: अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंनी आपण बुचकाळ्यात पडतो. त्यातील अनेक फोटो हे जंगली प्राण्यांचे असतात. असाच एक खतरनाक फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. त्यात रात्रीच्या आंधारात दोन चमकणारे गोष्टी दिसताय.  आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा फोटो शेअर केला आहे. हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हीही बुचकाळ्यात पडाल. नक्की ही चमकणारी गोष्ट काय हे अधिकाऱ्याने आपल्या पोस्ट मध्येच स्पष्ट केले आहे.

IFS अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. त्यात त्यांनी लिहले की, ''The eyes which make the forest bright. So what do you see.'' या शब्दांसह फोटोतील प्राणी कोणता हे जाणून घेण्याची उत्सुकता नेटकऱ्यांना पडली आहे.

अधिकारी परवीन कासवान यांनीही त्यांच्याच पोस्टमध्ये उत्तर दिले आहे. मात्र, त्यांनी उत्तर देण्यासाठी विल्यम ब्लेकच्या 'द टायगर' या कवितेतील एक ओळ निवडली.त्यामुळे या फोटोत दिसत असलेले चमकणारे डोळे वाघाचे आहेत. हे स्पष्ट होते.  फोटोला सोशलमीडियावर तुफान पसंती मिळत आहे.