कोर्टात नेताना आरोपीचा चेहरा काळ्या कपड्याने का झाकतात?

आरोपीला न्यायालयात नेत असताना चेहरा झाकण्यामागे एक मोठं कारण आहे.

Updated: Dec 25, 2021, 07:04 PM IST
कोर्टात नेताना आरोपीचा चेहरा काळ्या कपड्याने का झाकतात? title=

मुंबई : आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत किंवा असे अनेक नियम आहेत जे आपल्याला माहित नसतात. तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की, कोर्टात ओरोपींना घेऊन येताना त्यांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकले जाता. परंतु असे का केले जाते असा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? आरोपीचे तोंड झाकल्याने नक्की काय होतं? तर आज आम्ही तुम्हाला यामागील कारण सांगणार आहोत.

चेहरा झाकण्यामागचं कारण काय?

आरोपीला न्यायालयात नेत असताना चेहरा झाकण्यामागे एक मोठं कारण आहे. खरे तर आरोपीवरती गुन्हा सिद्घ झालेला नसतो आणि कोणत्याही आरोपीवर लावलेला आरोप सिद्ध होईपर्यंत त्याचा चेहरा समोर यायला नको. त्यामुळे कोणालाही आरोपीचा चेहरा पाहता न यावा यासाठी त्याचा चेहरा झाकला जातो.

आरोपी दोषी नाही

जोपर्यंत न्यायालय आरोपीला दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नसतो. म्हणूनच तोपर्यंत त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवू नये आणि आरोपासाठी त्याची बदनामी करू नये. त्यामुळेच न्यायालयात नेत असताना आरोपीचा चेहरा झाकण्यात येतो.

असे केल्याने आरोपीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते

नुसता आरोपी असताना जर एखाद्याचा चेहरा लोकांसमोर दिसला नाही आणि नंतर तो निर्दोष सिद्ध झाला, तर अशा व्यक्तीला आपले पुढचे आयुष्य जगणे सोपे जाते. अन्यथा निर्दोष सिद्ध होऊनही त्या व्यक्तीला बदनामीला सामोरे जावे लागते.

मीडिया देखील अनेक न्यायालयीन प्रकरणे कव्हर करते. अशा स्थितीत आरोपीचे फोटो आणि व्हिडीओ समोर येतात. मात्र तोंडावर कापड झाकले असल्याने आरोपीची बदनामी होत नाही.