ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला किस करणं डॉक्टरला पडलं महाग, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

Updated: Jan 14, 2019, 09:46 AM IST
ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला किस करणं डॉक्टरला पडलं महाग, व्हिडिओ व्हायरल title=

भोपाळ : मध्यप्रदेशच्या जिल्हा रुग्णालयातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका सहकारी महिलेला किस करतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातील हा डॉक्टरचं निलंबन करण्यात आलं आहे. हे प्रकरणाकडे यासाठी गांभीर्याने पाहिलं जात आहे कारण जिल्हा सरकारी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये हा प्रकार घडला आहे.

उज्जैनचे जिल्हाधिकारी शशांक मिश्रा यांनी म्हटलं की, एका अधिकाऱ्याला हे शोभत नाही. प्रकरणाचं गांभीर्य पाहता रुग्णालयाचे सिव्हील सर्जन डॉ राजू निदारिया यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी डॉ. पीएन वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निदारिया यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मागील २ दिवसांपासून ते सुट्टीवर आहेत. त्यांचं उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.'

जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी (सीएमएचओ) डॉ. मोहन मालवीय यांनी म्हटलं की, आयुक्तांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.'

सूत्रांच्या माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला नर्स आहे. हा व्हिडिओ ऑपरेशन थिएटरमध्ये बनवण्यात आल्याने तो अधिक चर्चेत आला आहे. मालवीय यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी माहिती दिली आहे की, 'यावर अजून कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.