सुरत : देशात कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे देशातील डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. परंतु या अत्यंत कठीण परिस्थितही रुग्णांच्या आरोग्यकडे लक्ष देण्यासोबतच त्यांच्या मनोरंजनाचीही काळजी डॉक्टरांच्यावतीने घेतली जात आहे. कोरोना वॉरियर्सने एका रुग्णाचा वाढदिवस रुग्णालयात साजरा केल्याचा व्हिडिओ सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गुजरातच्या सूरतमधील सिविल रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेचा व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने लोकांचे मन जिंकलं आहे. कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात सकारात्मक ऊर्जा या व्हिडिओमधून मिळतेय.
सुरतच्या सिविल रुग्णालयातील स्टाफने कोरोना रुग्णाचा वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत. 'तुम जिओ हजारो साल' हे सामुहिक गीतही म्हटले.
Surat is a land of good vibes, see how our doctors and medical staff from Surat CiVIL Hospital cheering Heena Ben on her birthday.
"कोरोना हमे रोक सकता है, पर हरा नहीं सकता।" pic.twitter.com/wv4bkQdpQ6
— C P Sarvaiya. (@cpsarviya) April 22, 2021
कोरोना महामारीच्या कठीण काळात अशा प्रकारे रुग्णांच्या मनोरंजनाचीही काळजी घेणारे कोरोना वॉरियर्सने खरंच देवदूत आहेत. एकीकडे औषधांनी रुग्णाच्या शरीरावर उपचार आणि दुसरीकडे मनोरंजनातून मनावर उपचार त्यामुळे कोरोनारुग्ण लवकरच कोरोनामुक्त व्हायला मदत होत आहे.
अशा देवदूतासमान डॉक्टरांना लोकं सलाम करीत आहेत. सुरतमधील हा व्हिडिओ सोशलमीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याला वापरकर्ते शेअर लाईक्स करीत कौतुकांचा वर्षाव करीत आहेत.