राम रहिमबाबत डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

राममहिमला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहेत. रोज नवीन नवीन खुलासे राम रहिम बाबत होत आहेत. आता डॉक्टरांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. रोहतक जेलमध्ये तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी राम रहीम सेक्सचा व्यसनाधीन असल्याचं म्हटलं आहे. हेच कारण आहे की त्याची प्रकृती खराब होत आहे आणि त्याची स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. डॉक्टर म्हणतात की, त्याला नीट झोप येत नाही. जर त्याच्यावर उपचार केले नाहीत तर त्यांची मानसिक संतुलनावर फरक पडू शकतो.

Updated: Sep 11, 2017, 02:23 PM IST
राम रहिमबाबत डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा title=

नवी दिल्ली : राममहिमला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहेत. रोज नवीन नवीन खुलासे राम रहिम बाबत होत आहेत. आता डॉक्टरांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. रोहतक जेलमध्ये तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी राम रहीम सेक्सचा व्यसनाधीन असल्याचं म्हटलं आहे. हेच कारण आहे की त्याची प्रकृती खराब होत आहे आणि त्याची स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. डॉक्टर म्हणतात की, त्याला नीट झोप येत नाही. जर त्याच्यावर उपचार केले नाहीत तर त्यांची मानसिक संतुलनावर फरक पडू शकतो.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या ५ डॉक्टरांच्या पथकांनी बाबाची तपासणी केली. त्यांचे आरोग्य चांगले आहे, परंतु लैंगिक व्यसनामुळे त्यांची समस्या वाढू शकते.

राम रहिम खायचा ही औषधे

राम रहिमने सुनावणी दरम्यान स्वतला नपुंसक म्हटले होते. डेराच्या सेवकाने देखील सांगितलं होतं की तो सेक्स पॉवर टॉनिक आणि औषधे घेतो. एवढेच नाही तर, त्याला मद्यपान आणि ड्रग्स घेण्याची देखील सवय होती. अल्कोहोल पितांनाचा त्याचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

२४ तास हजर असायची २५० महिला सेविका

प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, गुरमीत राम रहिमच्या सेवांसाठी अनेक महिला हजर असायच्या. राम रहीमने आपल्या सेवेत 200-250 महिला सेविका ठेवल्या होत्या. त्यांना इतर कोणत्याही पुरुषाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. एवढेच नाही तर, ज्या ठिकाणी या साध्वी राहायच्या त्या ठिकाणी फक्त बाबालाच जाण्याची परवानगी असायची.

तुरुंगात सोबत हवी हनीप्रीत 

राम रहिमची कथित कन्या हनीप्रीत हिच्यासोबत देखील त्याचे अवैध संबंध असल्याचाही आरोप होत आहेत. ती नेहमी त्याच्याबरोबर राहायची. एवढेच नाही तर त्याने हनीप्रीतला कारागृहात ठेवण्यासाठी देखील तुरुंग प्रशासनाकडे मागणी केली आहे. परंतू त्याची मागणी नाकारण्यात आली. सध्या हनीप्रीत फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे.