सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या नवीन नियमांचे बाजारावर काय परिणाम?

हॉलमार्किंग सोने, चांदी आणि प्लॅटिनमची शुद्धता प्रमाणित करण्याचा एक मार्ग आहे. 

Updated: Aug 11, 2021, 07:33 PM IST
सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या नवीन नियमांचे बाजारावर काय परिणाम? title=

मुंबई : केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य आहे जे टप्प्याटप्प्याने लागू केले जात आहे. केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे की, 16 जूनपासून हॉलमार्किंग लागू करण्यात आले आहे आणि देशात सर्वत्र सुरु करण्यावर भर दिली जात आहे. हॉलमार्किंगचा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही उचलण्यात आला आणि याबाबत सरकारसमोर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर सरकारने ही उत्तरे दिली आहेत.

परंतु पहिले हे जाणून घेऊयात की, सोन्याच्या हॉलमार्किंगबाबत सरकारला विरोधकांकडून काय काय प्रश्न विचारले गेले आहेत.

सरकारला विचारण्यात आले की, सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगच्या नवीन नियमाचा लहान ज्वेलर्सवर कसा परिणाम झाला आहे? त्याचबरोबर हॉलमार्किंगचे नवीन नियम लहान ज्वेलर्सना किती प्रभावित करू शकतात? आणि जर असे झाले असेल, तर सरकार नवीन नियमांची माहिती देईल का?

विरोधकांनी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी सरकारच्या वतीने दिली.

ते म्हणाले की, सोन्यावर हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्यात 256 जिल्हे समाविष्ट केले जात आहेत.  हे जिल्हे 28 राज्यांचे आहेत. ते म्हणाले की, "हा नियम 23 जून 2021 पासून लागू करण्यात आला आहे. सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की, हा नियम त्या जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आला आहे जिथे किमान एक मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्र आहे. या आदेशानुसार, 40 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या ज्वेलर्सना नियमांतर्गत समाविष्ट केले जात नाही."

हॉलमार्किंग काय आहे?

हॉलमार्किंग सोने, चांदी आणि प्लॅटिनमची शुद्धता प्रमाणित करण्याचा एक मार्ग आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ते विश्वासार्हता प्रदान करण्याचे एक साधन आहे.

हॉलमार्किंगची प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते आणि त्यावर भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे देखरेख केली जाते. जर दागिने हॉलमार्क केले असतील तर याचा अर्थ त्याची शुद्धता प्रमाणित आहे.

BISचे वैशिष्ट्य सोन्यासह चांदीची शुद्धता प्रमाणित करण्याचे साधन आहे. हे BIS चिन्ह प्रमाणित करते की, हे रत्न भारतीय मानक ब्यूरोच्या मानकांशी जुळते आणि ते खरे तसेच शुद्ध आहे. म्हणून, सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांमध्ये बीआयएस हॉलमार्क असल्याची खात्री करा.

हॉलमार्किंग का आवश्यक आहे?

सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असल्यास, याचा अर्थ असा की, त्याची शुद्धता प्रमाणित आहे. परंतु अनेक ज्वेलर्स तपास प्रक्रिया पूर्ण न करताच हॉलमार्क लागू करतात. अशा परिस्थितीत, हॉलमार्क खरे आहे की, नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.

भारतीय मानक ब्यूरोचे हॉलमार्क चिन्ह हे त्रिकोणी चिन्ह आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धतेचे प्रमाण देखील लिहिलेलं आहे. यात दागिने निर्मितीचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील असतो.

या नियमामुळे ज्वेलर्सवर परिणाम काय?

असे मानले जाते की, लहान दागिन्यांच्या व्यापारांना हॉलमार्किंगपासून आराम मिळू शकतो. सरकारने आणलेल्या UID च्या नियमानुसार, दागिन्यांचे डिझाईन वेबसाइटवर अपलोड करावे लागेल.

या सगळ्यामुळे ज्वेलर्स चिंतेत आहेत की, त्यांची अनोखी किंवा यूनिक डिझाईन चोरीला जाऊ शकते आणि हे डिझाइन सार्वजनिक होऊ शकते. यातील काही मुद्द्यांवर आज म्हणजे 11 ऑगस्ट संध्याकाळी चर्चा केली जाईल आणि असे मानले जाते की, हा निर्णय काही दिवसांसाठी पुढे ढकलला जाऊ शकतो आणि ज्वेलर्सना थोडा दिलासा मिळू शकतो.