नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं देशाच्या राजधानीत एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत येणा-या ५ राज्यांतील लोकांना कोविडचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब येथून दिल्लीत येणार्या लोकांना आरटी-पीसीआर दाखवल्यानंतरच दिल्लीत प्रवेश मिळेल. हे आदेश विमान, रेल्वे आणि बसने दिल्लीत येणा-या प्रवाशांना लागू होईल.
तर सरकारने दिल्लीकडे येणा-या प्रवाशांना अद्याप हा नियम लागू केला नाही. दिल्ली सरकार आज या निर्णयासंदर्भात औपचारिक आदेश जारी करू शकते. हा आदेश शुक्रवार, २६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पासून ते १५ मार्च रोजी दुपारी १२ पर्यंत लागू असेल. इतर राज्यामध्ये कोरोना बळावत आहे. पुन्हा दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट येवू नये म्हणून दिल्ली सरकार खबरदारी बाळगत आहे.
Travellers from Maharashtra, Kerala, Chhattisgarh, Madhya Pradesh and Punjab will need a negative coronavirus test report to enter #Delhi from 26th February till 15th March
— ANI (@ANI) February 24, 2021
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढ होत असल्यामुळे या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.