Crime News : हरिद्वार आणि ऋषीकेश इथं फिरायला गेलेले दोघे भाऊ घरी परतल्यानंतर त्यांच्या आईची आणि आजीची हत्या झाली होती. एकाच घरात दोन हत्या होऊनही कोणालाही आजूबाजूला पत्ता लागला नव्हता. घरातील सीसीटीव्ही कॅमेरासुद्धा बंद त्यामुळे पोलिसांंना आरोपीचा शोधं घेणं कठीण होतं. मात्र आरोपी कितीही हुशार असला तरी त्याच्याकडून काहीतरी पुरावा राहून जातो आणि तो सापडतो. अशाच प्रकारे पोलिसांनी वरील प्रकरणाचा अत्यंत शिताफीने तपास करत आरोपीला पकडलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शशांक आणि सार्थक हे दोघे भाऊ फिरायला गेलेले असतात, घरी आल्यावर ते बराच वेळ दरवाजा वाजवतात. घरी आजी आणि आई असल्यामुळे ते झापले असतील म्हणून शेजारच्यांकडून चावी घेऊन ते दरवाजा उघडतात. आतमध्ये गेल्यावर पाहतात ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. दोघांच्या आईचा आणि आजीची हत्या झालेली असते आणि घरातील सामान पडलेलं असतं. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय सर्वांना आला होता.
दोघेही मोठ्याने ओरडत बाहेर येतात, घटनेबाबत माहिती होताच पोलीस येतात. घराची पाहणी करतात तेव्हा त्यांच्या टेरेसचं झाकण उघडं असलेलं त्यांना दिसतं. त्यानंतर पोलीस तपास करण्यासाठी दोघांना चौकशीसाठी बोलावतात तेव्हा ते सांगतात. आम्ही हर्षित नावाच्या मित्राला घराची चावी देत लक्ष ठेवायला सांगितलं होतं. पोलीस हर्षितची चौकशी करतात तेव्हा तो सांगतो की, मी त्यांच्याकडे शेवटचा 13 ऑगस्टला गेलो होतो. त्यानंतर मी गेलो नाही आणि मला हत्या कधी झाली काही माहिती नाही.
असा झाला उलगडा
पोलसांना तपासामध्ये हर्षितच्याघराचे सीसीटीव्ही फुटेज सापडलं, त्यामध्ये तो शशांकच्या घरातून काही सामान घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. हर्षितने शशांककडून 5 लाख व्याजाने घेतले होते त्याला ते परत करायचे होते. शशांक आणि सार्थक फिरायला गेले तेव्हा त्यांनी हर्षितकडेच चावी ठेवली. याच वेळेचा फायदा घेत त्याने दुसऱ्याच दिवशी घरी जात मित्राच्या आईला आणि आजीला उशिने दाबलं आणि चाकू खुपसून संपवलं.