मुंबई : Dr Subhash Chandra Interview: झी मीडियाचा पुढच्या 5 वर्षातील प्लॅन आणि कर्ज कमी करण्यासाठी काय नियोजन असणार इंफ्रा बिझनेस कंपनीतील तोटा का झाला? Dish TV-Yes Bank वाद कधी संपणार? ZEEL-SONY विलिनीकरणाबाबत महत्त्वाची माहिती एस्सेल ग्रूपचे चेअरमन आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी दिली आहे.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशातील वातावरण सकारात्मक आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात झी ग्रुपवर अनेक गोष्टींवर सातत्याने काम सुरू आहे. मागे वळून पाहताना काही चुका झाल्या आहेत, त्यामुळे आर्थिक समस्या समोर आल्या आणि या समस्यांना तोंड देण्यासाठी अडीच वर्षे लागली. आता Metaverse, Crypto, NFT चे वय आहेयमी त्यांना 'Myverse' असे नाव देईन.
झी मीडियाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या 300 मिलियन युजर्स आहेत. पुढील 3 वर्षांत, आम्ही सक्रिय वापरकर्त्यांमध्ये 1 अब्ज लोकांना जोडू. याशिवाय आम्ही डिजिटल कंटेंटच्या कमाईवरही भर देण्याबाबत विचार करत आहोत.
प्रोमोटर लेवलवर पर्सनल कर्जावर 91 टक्के काम केलं आहे. इंफ्रा बिजनेसमध्ये जाणं ही चूक होती. ज्यांच्या जीवावर हा व्यवसाय सुरू केला ते लोकच चुकीचे होते. पुढच्या 2 महिन्यामध्ये कर्ज फेडण्याबाबत काम सुरू आहे.
डिश टीव्हीचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. तो कुठेही डिफॉल्टर नाही ना वाद आहे. यस बँकेनं 4210 कोटी रुपये व्हिडिओकॉनच्या D2h मर्जरसाठी देण्यात आले होते. आधीच्या मॅनेजमेंटनं आमच्यासोबत दगाबाजी केली. यस बँकेनं आधीच्या मॅनेजमेंटविरोधात FIR दाखल केली आहे.
बरेच लोक डिश टीव्हीबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. मीडियातील अनेकांना डिश टीव्ही-येस बँक वादाची नीट माहिती नाही. डिश टीव्हीच्या प्रवर्तक भागधारकांनी येस बँकेवर मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. येस बँकेसोबतच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
तारण ठेवलेले शेअर्स जप्त केल्यावर सावकार कंपनीचा भागधारक बनतो का? तारण ठेवलेल्या समभागांवर कर्जदाराचा अधिकार काय, हा मोठा प्रश्न आहे. तारण ठेवलेले शेअर्स जप्त करण्याचा कर्जदाराचा अधिकार जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. येस बँकेने ठरवावे की ती कर्ज देणारी आहे की भागधारक आहे. येस बँक जर कर्ज देणारी असेल तर त्याच्याशी कर्जाबाबत चर्चा केली जाईल.
झी एंटरटेनमेंट आणि सोनीच्या विलिनीकरणाचं काम योग्य दिशेनं जात आहे. काही गोष्टींना परवानगी मिळणं अद्याप बाकी आहे ती मिळाली की विलिनीकरण पूर्ण होईल.
सुभाष चंद्रा बोलताना पुढे म्हणाले की कधीही पैशांसाठी नवीन व्यवसाय सुरू नाही केला. व्यवसाय नेहमी काहीतरी नवीन आणि हेतूपूर्वक सुरू केला. झी मीडियाच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर 300 मिलियनहून अधिक युजर्स अॅक्टिव्ह आहेत. WION अशिया खंडातील पहिला ग्लोबल नेटवर्क आहे. देशातील नंबर 1चा आंतरराष्ट्रीय चॅनल आहे. तिथे टेक्नोलॉजीचा उपयोग जास्त करण्यात आला आहे. 5 वर्षात त्याचे 500 मिलियन युजर्स करण्याचा मनस आहे.
काही शेअर होल्डर्स निराश नक्की झाले आहेत. पण त्यांच्या हिताकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष केलं जाणार नाही. निराश होऊ नका हाच आमचा संदेश शेअर होल्डर्ससाठी आहे. यावेळी टेक्नोलॉजीमध्ये काहीतरी खास करण्याचा विचार आहे.