Drishyam Style Murder in Jabalpur: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि अभिनेत्री तब्बू (Tabbu) यांचा दृश्यम (Drishyam) तुम्ही पाहिला असेलच. याच चित्रपटाप्रमाणे एक घटना घडली आहे. अनेकदा चित्रपटांचा प्रभाव व्यक्तींवर पडतो असं म्हटलं जातं. मात्र आता फिल्मी स्टाइल थरार खऱ्या आयुष्यातदेखील अनुभवू लागले आहेत. अनेकदा चित्रपट पाहून किंवा वेबसिरीज पाहून गुन्हेगार त्या पद्धतीने कट रचतात. जबलपूरमध्ये ही असाच एक थरार अनुभवायला मिळाला आहे. दृश्यम चित्रपटाप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही एक घटना घडली आहे. यामुळं पोलिसही चक्रावले आहेत.
एका बेपत्ता असलेल्या तरुणाचा शोध सुरु होता. त्याचवेळी त्याच्या कुटुंबीयांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने तुमच्या मुलाची हत्या करुन मृतदेह पुरण्यात आला आहे. तसंच, जिथे मृतदेह पुरला आहे ती जागादेखील सांगितली आहे. या फोनने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. कुटुंबीय तातडीने पोलिसांकडे गेले व त्यांच्या मदतीने अज्ञात व्यक्तींने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले.
दृश्यम चित्रपटात एक सीन दाखवण्यात आला आहे. यात एका मोठ्या झाडाखाली पोलिस खोदकाम करत असतात. मात्र तिथे एका कुत्र्याचा मृतदेह त्यांना सापडतो. ते पाहून पोलिस बुचकळ्यात पडतात. असाच काहीसा प्रकार जबलपूर येथील एका कुटुंबासोबत झाला आहे. अज्ञात व्यक्तीने फोन केल्यापासून कुटुंबीय चिंतेत पडले आहे. या प्रकरणी कैंट पोलिस ठाण्यात तपास सुरु आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रोहित यादव यांचा डेअरीला बिझनेस आहे. 19 जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे दूध विकण्यासाठी बाहेर पडला मात्र त्यानंतर तो अद्याप घरी परतला नाही. बरेच दिवस झाले तरी तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांना त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा कुठेच शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
रोहितचा शोध सुरु असतानाच त्याच्या लहान भावाला एका अज्ञात नंबरवरुन फोन आला. त्या व्यक्तीने म्हटलं की, 21 जुलै रोजी सफेद कारमध्ये असलेल्या अज्ञात लोकांनी तुझ्या भावाची हत्या केली असून मृतदेह पुरला आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने पुढे म्हटलं की, नेताजी सुभाषचंद्र बोस तुरुंगाच्या मागे असलेल्या एका झाडाखाली त्याचा पुरण्यात आलं आहे.
फोन येताच रोहितचे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. ते देखील घटनास्थळी पोहोचले. तिथे नुकतील कोणीतरी एक कबर बनवलेली दिसली. पोलिसांनी ती खोदण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे एका सफेद गोणी सापडली. ती उघडताच पोलिसही चक्रावले आहेत. या गोणीत छिन्न-विछन्न असलेल्या अवस्थेत कुत्र्याचा मृतदेह सापडला आहे. मात्र अजूनही बेपत्ता युवकाचा शोध लागला नाहीये. त्याचा फोन स्वीच ऑफ येत आहे.