इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यांसाठी एक चांगली बातमी आहे.  

PTI | Updated: Jul 23, 2019, 08:49 PM IST
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत वाढवली title=

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने ३१ जुलै २०१९ ही तारीख इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी अंतिम मुदत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, या मुदतीला एक महिन्यांची वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी आणखी एक महिना मिळणार आहे. 

केंद्र सरकारने मुदत वाढ जाहीर केल्याने आता इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी आता १ महिना वाढीव मिळाला आहे. अर्थमंत्रालयाने याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे. सीबीडीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपत होती त्या करदात्यांना १ महिन्यची मुदत वाढवून दिली आहे.

दरम्यान, आता आयटी रिटर्न्स भरताना करदात्यांना जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये ३ महिने व्हॅट कायदा आणि ९ महिने जीएसटी कायदा लागू होता. याआधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल आणि इतर माहिती इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना गरजेची नव्हती. मात्र, आता ती द्यावी लागणार आहे.