मातृदिनानिमीत्त अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केली भावूक पोस्ट; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

जागतिक मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. नुकतंच हेमांगीला  मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे या हिंदी कॉमेडी शोच्या मंचावर मोठं सरप्राईज मिळालं आहे.

Updated: May 12, 2024, 01:30 PM IST
मातृदिनानिमीत्त अभिनेत्री  हेमांगी कवीने शेअर केली भावूक पोस्ट; पाहून तुमचेही डोळे पाणावतील title=

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.  मराठीबरोबरच हेमांगी आता हिंदी मनोरंजनसृष्टीही गाजवत आहे. मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे या हिंदी कॉमेडी शोमधून हेमांगी प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहे. आपल्या अभिनयातून खळखळून हसवणारी अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांच्या डोळे पाणावले आहेत. . अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या हेमांगीने प्रेक्षकांची मनं जिंकली. जागतिक मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. नुकतंच हेमांगीला  मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे या हिंदी कॉमेडी शोच्या मंचावर मोठं सरप्राईज मिळालं आहे. या निमीत्ताने हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

मातृदिनानिमीत्त हेमांगीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत हेमांगीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर प्रेम असतं. ते दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मुल वाढवताना ती जे जे करते ते जगात कुणीच करू शकत नाही पण जेव्हा हीच मुलं मोठी होऊन अभिनय क्षेत्रासारखी जरा हटके/ वेगळी वाट निवडतात ना तेव्हा त्या मुलांसोबत त्या आईचा ही struggle सुरु होतो! हा video पाहतांना माझ्या आईचा सगळा struggle, तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे, घरातल्याच लोकांची पत्करलेली नाराजी, उघडउघड कधीच नाही पण नकळतपणे माझ्यात रूजवलेलं धैर्य, बळ आणि आज माझ्याबद्दल बोलताना तिचा भरून आलेला ऊर पाहून अत्यानंद झाला आणि माझा बांध फुटला! (Screen वर दिसणारं सगळंच scripted नसतं!) Mother’s Day निमित्ताने आज मी तिला Surprise, Gift द्यायला हवं होतं पण तिनेच Madness Machayenge च्या ‘Mother’s Day special’ episode मध्ये हा video पाठवून मला हे Surprise आणि गोड gift दिलं! या video साठी मी sonytvofficial आणि optimystixmedia च्या संपुर्ण team चे आभार मानते! एवढ्या मोठ्या मंचावर 1st time माझी Mummy दिसणार! Yay! My mommy bestest! Happy Mother’s Day!''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेमांगीने शेअर केलेल्या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अभिनेता समीर चौगुलेने कमेंट करत म्हटलंय, .काय क्षण असतो न ग...किती सुंदर क्षण....खूप प्रेम आईंना आणि तुला ही...हेमांगी..proud moment for. तर ऋतुजा देशमुखने म्हटलंय, अरे कसला गोड गं....बघताना पण डोळ्यात पाणी आलं...खूप प्रेम. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स युजर्सही या पोस्टवर करत आहेत.