गुजरात आणि मिझोराममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

देशात अनेक भागात भूकंपाचे हादर बसत आहेत.

Updated: Jul 5, 2020, 07:26 PM IST
गुजरात आणि मिझोराममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

गांधीनगर : कोरोना संकटात देशात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. रविवार दुपारी लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर संध्याकाळी गुजरात आणि मिझोराममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुजरातच्या कच्छ क्षेत्रात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी 5.11 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर 15 मिनिटांनी मिझोरामध्ये ही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी होती. तर मिझोराममध्ये ती 4.6 इतकी होती. याआधी लडाखच्या कारगीलमध्ये 3.37 मिनटांनी भूकंपांचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता 4.7 होती. भूकंपाचं केंद्र करगीलपासून 433 किलोमीटर लांब होतं. पण सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही.

3 जुलैला संध्याकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. संध्याकाळी 7 वाजता येथे भूकंपाचे हादरे जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी होती.

गुरुवार देखील कारगीलमध्ये भूकंपाचे हादरे बसले होते. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.5 इतकी होती. करगीलपासून 119 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र होतं.

लडाखनंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले. दुपारी 2.02 वाजता 3.6 तीव्रतेचा भूकंप जाणवला. 

1 जुलैला जम्मू-काश्मीरमध्ये 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते.