पटना : बेनामी संपत्ती आणि रेल्वे हॉटेलमध्ये घोटाळ्यांमध्ये फसलेले आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात ईडीने रेल्वे हॉटेल अलॉटमेंटमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केस फाईल केली आहे. ईडीने लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर केस दाखल केली आहे. हे प्रकरण 2006 मधलं आहे. त्यावेळेस लालू यादव रेल्वेमंत्री होते.
सीबीआयने या प्रकरणात आधीच लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि तेजस्वी यादव तसेच आयआरसीटीसीचे तत्कालीन एमडी पी के गोयल, यादव यांचे विश्वासू प्रेमचंद गुप्तांची पत्नी सुजाता आणि अन्य काही लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
बुधवारी नितीश कुमार यांनी तेजस्वी यांच्यावर असलेल्य़ा आरोपांमुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या घोटाळ्यामुळे बिहारमधील महाआघाडी देखील संपूष्टात आली आहे. बिहारमध्ये पुन्हा जेडीयू आणि भाजपने एकत्र येत सरकार बनवलं आहे.