हवेत उडणारा हा हत्ती खरा की खोटा....पाहा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

बापरे! हा हत्ती हवेत कसा उडाला... हा हत्ती खरा आहे की....तुफान व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय? 

Updated: Dec 11, 2021, 08:45 PM IST
हवेत उडणारा हा हत्ती खरा की खोटा....पाहा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य title=

नवी दिल्ली: सर्वात बुद्धीमान आणि बलाढ्य प्राणी समजला जातो. हा बलाढ्य प्राणी जर हवेत उडाला तर? आता तुम्ही म्हणाल की हे कार्टून किंवा एखाद्या सिनेमातच होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओमध्ये चक्क छोटा हत्ती हवेच्या दाबामुळे हवेत उडताना दिसत आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. काहींना हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटलं. तर काहींनी हे शक्य नाही असंही आपलं मत व्यक्त केलं आहे. 

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील हत्ती हा खरा नसल्याचं समोर आलं आहे. हा हत्ती एका बर्थ डे पार्टीसाठी वापरण्यात आलेला हत्ती होता. हा हत्ती म्हणजे एक प्रकारचा फुगाच होता. या फुग्याचा आकाराचा हत्ती हवेत उडाला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ कुठला आहे. कोणत्या बर्थ डे पार्टीतला आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.