VIRAL ELEPHANT VIDEO ON SOCIAL MEDIA: सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत (social media viral video) असतं. व्हायरल होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात ,काही व्हिडीओ घाबरवणारे असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे.
जिथे संयम असतो तिथे सर्वकाही शक्य होत असं म्हणतात. संयमाच्या जोरावर माणूस ताकदवर गोष्टींनादेखील नमवू शकतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जो पाहून खरंच सर्वजण चकित झाले आहेत
जंगलाचा राजा म्हणजे सिंह (Lion) . त्यामुळे सिहिणींचा (Lionesses) ही तोरा आणि वर्चस्व तितकंच असत हे सर्वानाच माहित आहे. सिहींण एका हत्तीला क्षणात चितपट करू शकते. पण जंगल है बॉस तिथे काही होऊ शकत. जंगलाचा नियम आहे इकडे कोणी कोणावर कधीही भारी पडू शकतो.
सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात आपण पाहू शकतो एक छोटासा हत्ती आहे त्यावर 14 सिंहिणींनी हत्तीवर हल्ला करतात पण छोटासा हत्ती घाबरत नाही. शांत राहून, संयमाने तो संकटावर मात करतो. व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video) खूपच अनोखा आहे, जो पाहून तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीत ताकदवर बाजूचा विजय होईल असं नाही. संयमाने माणूस ताकदवर गोष्टींसमोर देखील लढू शकतो. व्हिडिओ पाहा, ज्यात हत्तीने सिंहिणीशी ज्या प्रकारे स्पर्धा केली ती कौतुकास्पद आहे.
Lone tusker takes on 14 lionesses & wins…
Who should be than king of forest ?
Via Clement Ben pic.twitter.com/kYbZNvabFv— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 27, 2022
14 सिंहीणी हत्तीच्या पिल्लावर हल्ला करण्यासाठी धावून जातात आता त्याच काही खार नाही असं वाटौ लागत आणि त्याचवेळी बराच वेळ शांत बसलेला गजराज मोत्याने गरागरा फिरू लागतो. तो मुळीच घाबरत नाही त्यामुळे सिंहीणी त्याच्या अंगावरून खाली सुद्धा पडतात. त्यानंतर तो पाण्याच्या दिशेने धावतो पण सिंहिणी त्याला सोडत नाही. हत्ती तिथून पाण्याच्या दुसऱ्या बाजूला जायला लागतो आणि सिंहिणी त्याच्याकडे पाहतच राहते. आणि अशा प्रकारे तो स्वतःची सुटका करून घेतो.
या व्हिडीओवरून एकच काळात कि या जगात कोणीही लहान किंवा मोठं नाहीये. ज्याच्याकडे योग्य वेळी योग्य निर्णय घायची क्षमता तोच खरा राजा.