SIP Stock | अनलॉकमध्ये हा स्टॉक ठरेल मालामाल; तज्ज्ञांनीही दिला थम्सअप

 देशातील विविध भागातील लॉकडाऊन आता शिथिल होत आहे. यादरम्यान काही सेक्टरला दमदार फायदा होणार आहे

Updated: Aug 13, 2021, 01:10 PM IST
SIP Stock | अनलॉकमध्ये हा स्टॉक ठरेल मालामाल; तज्ज्ञांनीही दिला थम्सअप title=

मुंबई : देशातील विविध भागातील लॉकडाऊन आता शिथिल होत आहे. यादरम्यान काही सेक्टरला दमदार फायदा होणार आहे. यामध्ये एक सेक्टर म्हणजे पेपर इंडस्ट्री होय. या सेक्टरमधील  Emami Paper अनलॉक प्रोसेसमध्ये multibagger ठरणार आहे. जर तुम्ही चांगल्या परताव्यासाठी चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर पेपर बनवणाऱ्या या शेअरवर लक्ष ठेऊ शकता. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत कंपनीच्या उत्पन्न आणि नफ्यात वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. अशातच कंपनीच्या शेअर्समध्ये शॉर्ट टर्म आणि मिड टर्म गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. झी बिझनेसचे संपादक अनिल सिंघवी यांनी देखील Emami Paper हा शेअर SIP Stock साठी निवडला आहे.

सिंघवी यांनी म्हटले आहे की, अनलॉकमुळे संपूर्ण पेपर सेक्टरचे सेंटिमेट मजबूत झाले आहेत. Emami Paper ला चांगल्या फंडामेंटल्सचा फायदा मिळेल. ही कंपनी पूर्व भारतातील मोठी कंपनी आहे. कंपनीने मागील 2 वर्षात 410 कोटींचे कर्ज फेडले आहे. कंपनीचा फोकस आपले कर्ज संपवण्याकडे आहे.

शेअरमध्ये येणार तेजी.
Emami Paper ला अनलॉकींगचा फायदा होईल. शाळा आणि कॉलेज हळु हळु सुरू होत आहेत. कंपनी जो कच्चा माल वापरते, त्याची किंमत बरीच कमी झाली आहे. कंपनीचा स्टॉक वॅल्युएशनच्या हिशोबाने खूपच स्वस्त आहे. स्टॉक शॉर्ट टर्मसाठी 240 रुपये आणि मिड टर्मसाठी 275 रुपयांचे लक्ष गाठू शकतो.