साखरपुड्यात अंगठी घालताना नवरदेवावर आली अशी परिस्थिती

साखरपुडा, हळदी, लग्न यासर्व कार्यक्रमांमध्ये नवरा-नवरी, नातेवाईक सर्वांचीचं लगबघ सुरू असते.  

Updated: Jul 14, 2021, 07:16 AM IST
साखरपुड्यात अंगठी घालताना नवरदेवावर आली अशी परिस्थिती

मुंबई : लग्न ठरलं की सगळीकडे नुसती गडबड असते. साखरपुडा, हळदी, लग्न सर्व कार्यक्रमांमध्ये नवरा-नवरी, नातेवाईक सर्वांचीचं लगबघ सुरू असते. नवीन जोडपं तर नव्या आयुष्यासाठी उत्सुक असतात. पण मनावर थोडं दडपण देखील असतं. ऐरवी आपण पाहतो सखारपुडा, लग्नात नवरी थोडी घाबरलेली असते. पण याठिकाणी साखरपुड्यात तर चक्क नवरदेवचं घाबरला. होणाऱ्या पत्नीला अंगठी घालताना त्याचे हात थरथर कापायला लागले. या अनोख्या साखरपुड्याचा एक व्हिडिओसध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. .

सध्या या जोडप्याचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरी स्टेजवर उभे आहेत. साखरपुड्याच्या विधी सुरू आहेत. नवरा, नवरीला अंगठी घालण्यासाठी जातो. नवरीचा हात अंगठी घालण्यासाठी नवरदेवाने हातात घेतला तेव्हा त्याचे हात चक्क कापायला लागले. नवरदेवाची ही वागणूक पाहून नवरीला देखील पोट धरून हासू लागते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत 99 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. एवढंच नाही व्हिडिओवर एकापेक्षा एक कमेन्ट देखील येत आहेत.