EPF धारकांनो ऑफरचा लाभ घ्या, नाहीतर अकाऊंट होईल लॉक...

EPF-Aadhaar Linking : ईपीएफ खातेधारकांसाठी एक चांगली बातमी आहे.  

Updated: Jun 16, 2021, 05:18 PM IST
EPF धारकांनो ऑफरचा लाभ घ्या, नाहीतर अकाऊंट होईल लॉक... title=

मुंबई : EPF-Aadhaar Linking : ईपीएफ खातेधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. ईपीएफओने (EPFO) पीएफ खाते  (PF Account) आणि यूएएन क्रमांकाशी (UAN Number) आधार क्रमांक (AAdhaar Number) जोडण्याची अंतिम तारीख 3 महिन्यापर्यंत वाढवली आहे. (EPF-Aadhaar Linking Deadline Extended) ही तारीख आता 1 सप्टेंबर 2021 (ईपीएफ-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत वाढविली आहे). करण्यात आली आहे. ईपीएफ-आधार लिंक (EPF-Aadhaar Linking Deadline) करण्याची अंतिम मुदत 1 जून 2021 होती. जर तुम्ही अद्याप कोणत्याही कारणास्तव तुमचा आधार क्रमांक पीएफ खाती आणि यूएएन खात्याशी लिंक केलेला नसेल तर आता तात्काळ करुन घ्या.

आताच करा लिंक, नंतर होईल त्रास

जर तुम्ही आधार क्रमांक पीएफ खाते आणि यूएएन क्रमांकाशी जोडलेला नसेल तर तो त्वरित जोडा. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सरकारने यापूर्वीच आधार आणि पॅन जोडण्यासाठी अंतिम तारीख वाढविली होती. (Aadhaar PAN Linking Deadline) यापूर्वी ईपीएफओने या कामासाठी 1 जून 2021 ची अंतिम मुदत दिली होती. यामुळे मालकांना त्यांच्या कर्मचार्‍यांचा आधार क्रमांक त्यांच्या पीएफ खाते किंवा यूएएन क्रमांकाशी जोडण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

पीएफ रिटर्नची तारीख वाढविली

ईपीएफओने जारी केलेल्या आदेशानुसार आधार सत्यापित यूएएनसह पीएफ रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 3 मे रोजी एक अधिसूचना जारी केली, ज्यात सामाजिक सुरक्षा संहिता अंतर्गत लाभार्थ्यांकडून आधार क्रमांक घ्यावा, असे म्हटले आहे. त्यानंतरच ईपीएफओने अंतिम मुदत वाढविली आहे.