कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी; पीएफ व्याजदरात कपात

नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Updated: Mar 5, 2020, 02:10 PM IST
कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी; पीएफ व्याजदरात कपात title=

मुंबई : केंद्र सरकारचा नोकरदारांना मोठा धक्का दिला आहे. पीएफच्या व्याजदरात कपात केली आहे. यामुळे भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर आता कमी मिळणार आहे. नोकरदार वर्गासाठी ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात केंद्र सरकानं कपात केली आहे. दोन वर्षांनंतर पीएफवरील व्याजदरात ही कपात करण्यात आली असून व्याजदर ०.१५ टक्क्यांनी घटवण्यात आल आहे. ८.६५ टक्क्यांवरून व्याजदर ८.५०वर केला आहे. केंद्र सरकारनं नोकरदारांना धक्का दिला आहे. २०१८-१९मध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.६५ टक्के इतका व्याजदर होता. आता हा व्याजदर ८. ५० टक्के इतका असणार आहे.

'एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन'च्या (ईपीएफओ) गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी होणार असल्याने ही व्याज कमी करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.  २०२० साठी पीएफमधील ठेवींवरील व्याजदर १५ बेसिस पॉइंटनी घटवून ८.५ टक्के करण्यात आला आहे. या मुद्द्यावर 'ईपीएफओ'च्या केंद्रीय विश्वस्त समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने व्याजदर घोषित केला आहे. हा व्याजदर 8.50 % इतका आहे.  संघटनेने केलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा न मिळाल्याने संघटनेने यंदा व्याजदर 0.15 टक्क्याने कमी केलं आहे.