EPFO Updates : पीएफबाबत मोठी बातमी, व्याजाचा दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय

EPFO Updates : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मागील वर्षीचे व्याज खात्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्मचारी भविष्य निधीच्या व्याजात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, ईपीएफच्या व्याजदरात वाढीचा निर्णय झालेला नाही. परंतु दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय झाला आहे.  

Updated: Mar 28, 2023, 11:13 AM IST
EPFO Updates : पीएफबाबत मोठी बातमी, व्याजाचा दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय title=

EPFO Updates : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कर्मचारी भविष्य निधीच्या व्याजात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, ईपीएफच्या व्याजदरात वाढीचा निर्णय झालेला नाही. परंतु दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. EPFOच्या बोर्डसमितीची बैठक सोमवारपासून सुरु आहे. आज या बैठकीचा शेवटचा दिवस आहे. EPFO ने अद्याप गेल्यावर्षीचं व्याजही दिलेले नाही. ते व्याजही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याबाबत निर्णय आज होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मोठी रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे सर्व कर्मचारी वर्गाचं या बैठकीकडे लक्ष लागले आहे. 

 तुम्ही नोकरी करत असाल आणि पीएफ व्याजाची (PF) वाट पाहत असाल तर लवकरच तुमच्या खात्यात मोठी रक्कम येण्याची शक्यता आहे.  EPFO आपल्या दोन दिवसीय बैठकीत 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदराची घोषणा करु शकते, अशी शक्यता होती. आता हा दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

मार्च 2022 मध्ये, EPFO ​​ने 2021-22 साठी सुमारे पाच कोटी भागधारकांच्या EPF वरील व्याजदर चार दशकांहून अधिक कमी 8.1 टक्क्यांवर आणला होता. हा दर 1977-78 पासून सर्वात कमी होता, जेव्हा EPF वर आठ टक्के व्याजदर असायचे. 2020-21 मध्ये हा दर 8.5 टक्के होता. मात्र, बैकीत झालेल्या निर्णयानुसार व्याजाचा दर हा  8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

2022-23 साठी ईपीएफवरील व्याजदरावर निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. EPFO दर 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहेत. मार्च 2020 मध्ये ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्क्यांच्या सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आणला होता. 2018-19 साठी तो 8.65 टक्के होता. मात्र, आता  दर हा  8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्याच्या आदेशावर ईपीएफओने काय कारवाई केली आहे. यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. EPFO ने आपल्या भागधारकांना 3 मे 2023 पर्यंत वेळ दिला आहे.