EPFO Salary Limit:इन हँड सॅलरी कमी झाली तरी नोकरदारांनाच होणार फायदा; जाणून घ्या कसे?

EPFO Salary Limit : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) साठी वेतन मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये केली जाऊ शकते. हा बदल झाल्यास येत्या काळात कर्मचाऱ्यांचा टेक होम पगार कमी होऊ शकतो.

Updated: Apr 19, 2022, 08:42 AM IST
EPFO Salary Limit:इन हँड सॅलरी कमी झाली तरी नोकरदारांनाच होणार फायदा; जाणून घ्या कसे? title=

मुंबई : EPFO Salary Limit Hike : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) साठी वेतन मर्यादा 15 हजार रुपयांवरून 21 हजार रूपये करण्याचा प्रस्ताव आहे. असे झाल्यास 75 लाख नोकरदारांवर याचा परिणाम होईल. 

काय परिणाम होईल?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ईपीएफसाठी वेतन मर्यादा वाढवल्याने, ईपीएफमधील योगदान वाढू शकते, परंतु त्यामुळे थेट हातात येणारा पगार (टेक होम) कमी होईल. पण शेवटी त्याचा फायदा कर्मचाऱ्यांनाच होणार आहे. यामुळे त्यांची बचत वाढेल आणि EPS मध्ये अधिक योगदान मिळेल.

सरकारी मान्यता आवश्यक

ईपीएफओ बोर्डाच्या निर्णयाला सरकारची मंजुरी आवश्यक आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच यामुद्यावर पुढे निर्णय होऊ शकतो. 

या निर्णयामुळे सरकारवर बोजा पडणार आहे. सरकार EPFO ​​च्या कर्मचारी पेन्शन योजनेवर दरवर्षी 6,750 कोटी रुपये खर्च करते. पगार मर्यादा वाढवल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी लागणार आहे.

शेवटचा बदल आठ वर्षांपूर्वी 

EPF योजना 15 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या नोकरदारांसाठी आवश्यक आहे. यामध्ये सरकार तुमच्या मूळ वेतनाचा 1.6 हिस्सा योगदान म्हणून देते.

पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये केल्यास 75 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मागील वेळी 2014 मध्ये पगार मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली होती.