नवी दिल्ली : सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वाद सुरू असतानाच, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश द्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. मात्र स्थानिकांचा तसंच कट्टर हिंदुत्ववाद्यांचा याला तीव्र विरोध आहे. अशावेळी स्मृती ईराणी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून या वादाला आणखी फोडणी दिलीय.
सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला त्यांनी एकप्रकारे विरोधच केलाय. तुम्ही मासिक पाळीच्या रक्तस्त्रावात बुडालेला सॅनिटरी पॅड घेऊन नातेवाईकांकडे जाता का? मग देवाच्या मंदिरात का जाता? असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलंय. स्मृती इराणींच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी 'झी २४ तास'ला फोनवरुन प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुर्खासारखे हे विधान आहे, असे त्या म्हणाल्यात.
वशिल्याने त्या मंत्री झालेत. स्मृतींचे वक्तव्य मुर्खासारखे केलेय. आमच्या घरात देव आहेत. मुलींना शिकवण असते. त्यामुळे पाळीच्यावेळी कोणी मंदिरात जात नाही. मुर्खासारखे व्यक्तव्य करणाऱ्या या बाईला काहीही समजत नाही. सिनेमात काम करणाऱ्यांना मंत्रीपद मिळालेय. त्याकाही निवडणून आलेल्या नाही. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशोभनीय वक्तव्य केले. मुक्ताफळे उधळलेत. तुम्हाला अशी शिकवण नाही, त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केलेय. त्यांचा पुतळा जाळला पाहिजे, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी व्यक्त केलेय.
विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करु नये. प्रसिद्धीच्या लाटेवरुन त्यांनी राजकीय पक्षात प्रवेश केलाय. त्यांचा विधानाचा गांर्भीयाने विचार करावासा वाटत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी आणि विषयाचे लक्ष वळविण्यासाठी हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिलेय.