मुंबई : पैसे ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. आपण त्यासाठीच आयुष्यात मेहनत करतो. तुम्ही वेगवगळ्या प्रकारचे रुपये पाहिले असेल. आपल्याकडे 10,20,50,100 रुपयांच्या नोटांपासून ते अगदी 1,2,5,10 रुपयांच्या नाण्यांपर्यंत सगळेच आपण चलनात वापरतो. या चलनाचं मुल्य एक असलं तरी बऱ्याचदा त्याची डिझाइन वेगळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यात तुम्ही एक रुपयाच्या नाण्याला नीट पाहिलं तर तुम्हाला त्यावर अंगठा दिसेल. परंतु तो नाण्यावर का असतो? असा तुम्ही कधी विचार केलाय?
नुसतं एक रुपयांचं नाणंच नाही तर, दोन रुपयांच्या नाण्यांमध्ये देखील हाताचे असे ठसे बनवलेले पाहायला मिळते. परंतु तुम्हाला माहितीय का? ही नाणी केवळ डिझाईनसाठी नसून त्यांचा विशेष अर्थ आहे. तसेच, या चिन्हांमागे एक कथा आहे, जी या हातांचा अर्थ काय आहे हे सांगते. चला तर मग जाणून घेऊयात या चिन्हांशी संबंधित खास गोष्टी.
हे चिन्ह भरतनाट्यम नृत्यातून घेतलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला नाण्यावर दिसणारी चिन्हे ही भरतनाट्यम नृत्याची मुद्रा आहेत. तसेच हे हाताचे जेश्चर आहेत. हे चलन फक्त एक आणि दोन रुपयांबद्दलच सांगतात.
यावरील डिझाईनचे काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे प्राध्यापक अनिल सिन्हा यांनी केले आहे.
या नाण्यात 83 टक्के लोह आणि 17 टक्के क्रोमियम असते. तसेच या नाण्याबद्दल आणखी काही सांगायचं झालं तर, ही नाणी 2007 मध्ये आली होती.