गाडीच्या टायरवर का बनवले जातात असे रबराचे काटे? जाणून घ्या यामागचं कारण

आपल्यापैकी अनेकांना टायरवरील हे काटे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट वाटतात, ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही.

Updated: Jul 18, 2022, 05:22 PM IST
गाडीच्या टायरवर का बनवले जातात असे रबराचे काटे? जाणून घ्या यामागचं कारण title=

मुंबई : आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या गाड्या असतात. यांपैकी काही टू व्हिल्हर, काही थ्री व्हिलर तर काही फोर व्हिल्हर आहेत. एवढेच काय तर बस, ट्रक, टॅम्पो देखील आपल्या आजूबाजूला आहेत. परंतु तुम्ही त्यांच्या टायरला कधी नीट पाहिलं आहे का? त्या टायरवरती रबराचे छोटे काटे असतात. परंतु हे काटे का असतात? याचा कधी तुम्ही विचार केलाय? या काट्यांचं नेमकं कार्य तरी काय आहे? चला जाणून घेऊ या.

आपल्यापैकी अनेकांना टायरवरील हे काटे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट वाटतात, ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. परंतु तुम्हाला माहितीय हे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नाही तर ही टायरची विशिष्ट रचना किंवा डिझाइन आहे.

टायरमधील रबरी काटे एका खास उद्देशाने बनवले गेले. टायरवरील हे रबरी काटे वेंट स्प्यूज म्हणून ओळखले जातात. याचा अर्थ असा आहे की. काहीतरी बाहेरून पसरत आहे. म्हणजेच काय तर असे काटे टायर्सची कार्यक्षमता सुधारण्यासाठी बनवले जातात.

सोप्या भाषेत समजून घ्यायचे झालं, तर वाहन चालू असताना टायरवर दबाव निर्माण होतो, हा दबाव कमी करण्यासाठी हे काटे तयार केले जातात.

जेव्हा ते बनवणार्‍या कंपन्या टायर बनवतात तेव्हा रबरचे हे धारदार भाग टायरमध्ये टोचले जातात. असे का केले जाते, आता याचे आणखी एक कारण जाणून घ्या.

टायर बनवताना त्यात बुडबुडे तयार होण्याचा धोका असतो. हे अंतर्गतरित्या घडल्यास, टायर कमकुवत होऊ शकतात, म्हणून त्यांना असे काटे काढल्याने  याचा धोका कमी होतो

जर तुम्ही टायर विकत घेत असाल आणि त्यात हे काटे असतील तर त्याचा अर्थ असा आहे की, तो टायर दर्जेदार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही असा काटे असलेला टायर विकत घ्या, तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.